दाजीची मज्या अन् गावकरांना सजा!

पणदारे, 25 ऑक्टोबरः पणदारे गावात सध्या दाजीच्या मटक्याचा व जुगारीच्या अड्ड्याचा कुख्यात कथा ऐकायला मिळत आहेत. रोज अड्ड्यावर बोकडाची तंदुरी व दारुच्या बॉक्सची मेजवाण्या चालत आहेत. ऐवढा मोठा दोन नंबरचा धंदा दाजीचा पणदारे येथे चालू आहे. मटक्याची लाखोंची उलाढाल, झुगारीचा 50-100 चा टेबल किती शुटिंग निघत असेल याची चर्चा ग्रामस्थ करत आहेत.

डुब्लिकेट!

आजपासून आमरण उपोषणाला सुरुवात करणार- जरांगे पाटील

परगावावरून बडे- बडे खेळाडू पणदारे येथे सध्या येत आहे. खुले आम चालणाऱ्या या धंद्यामुळे पणदारकर धस्तावले आहेत. कोणाच्या राजकीय वरदहस्तामुळे दाजी हा जुगार-मुटक्याचा धंदा चालतो? हे सर्वांना माहित आहे. नव्याने माळेगाव हद्दीत आल्यापासून पणदारे हे दोन नंबरचे कमईचे ठिकाण झाले आहे. या धंद्यावर पोलीस कारवाई करण्यास धजवत नसून सुरक्षित जुगार- मुटका अड्डा म्हणून कुप्रसिद्ध पावला आहे. त्यामुळे दाजीच्या धंद्यावर पोलीस प्रशासनाची मेहरबानी का? हा प्रश्न छोटे व किरकोळ दोन नंबर वाले विचारत आहे.

दीक्षाभूमीवर 200 कोटींच्या विकासकामांचा शुभारंभ

One Comment on “दाजीची मज्या अन् गावकरांना सजा!”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *