बारामतीतील दैनंदिन पाणीपुरवठा आजपासून सुरळीत, नगरपरिषदेची माहिती

बारामती, 12 जून: (विश्वजीत खाटमोडे) बारामती शहरातील दैनंदिन पाणीपुरवठा आजपासून सुरळीत करण्यात आला आहे. या संदर्भातील माहिती बारामती नगर परिषदेने दिले आहे. दरम्यान, नीरा डाव्या कालव्याच्या आवर्तन बंद गेल्या काही दिवसांपासून बारामती शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात होता. मात्र, बारामती शहरातून वाहणाऱ्या नीरा डाव्या कालव्यात आता आवर्तन झाल्यामुळे बारामती शहरातील दैनंदिन पाणीपुरवठा आजपासून पुन्हा एकदा सुरू झाला आहे.

https://www.facebook.com/share/p/KFBWYAktNPSYsCnF/?mibextid=oFDknk



राज्यात गेल्या वर्षी पाऊस कमी झाल्यामुळे राज्यातील बहुतांश भागात यंदा दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली होती. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती. तसेच शेतीचा आणि गुरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु, यंदा राज्यात मान्सूनच्या पावसाला चांगली सुरुवात झाली आहे. त्यामुळे राज्यातील नागरिक तसेच शेतकरी वर्गामध्ये सध्या आनंदाचे वातावरण आहे. तर राज्यात यंदाच्या पावसाळ्यात असाच पाऊस पडत राहिला तर, राज्यातील पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

तत्पूर्वी, दुष्काळी परिस्थितीमुळे बारामतीकरांवर देखील पाणी कपातीचे संकट उदभवले होते. बारामती शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या डावा कालव्याचे आवर्तन बंद करण्यात आल्यामुळे शहरासाठी मर्यादित पाणीसाठा उपलब्ध होता. या पार्श्वभूमीवर, बारामती नगरपरिषदेने शहरातील पाणीपुरवठा 30 मे 2024 पासून एक दिवसाआड करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर नीरा डाव्या कालव्याचे आवर्तन मिळाल्याने बारामती मधील पाणीपुरवठा आजपासून पुन्हा सुरळीत झाला आहे. त्यामुळे बारामतीकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *