बारामतीत श्री मोरया सामाजिक प्रतिष्ठानचा दहीहंडी उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा

बारामती, 02 सप्टेंबर: (विश्वजीत खाटमोडे) बारामती शहरात श्री मोरया सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने दहीहंडी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. श्री मोरया सामाजिक प्रतिष्ठानचे संस्थापक शुभम पडकर आणि सत्यजित टिंगरे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. हा दहीहंडी उत्सव मोठ्या जल्लोषात पार पडला. यावेळी गोविंदांनी ही मानाची दहीहंडी फोडली. त्यानंतर आयोजकांकडून विजेत्या गोविंदांचा बक्षीस आणि चषक देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी, बन्नी माने, गुलाब धोत्रे, तुकाराम धोत्रे, सचिन शिंदे, विकास भोसले यांच्यासह श्री मोरया सामाजिक प्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थित होते.



दरम्यान, दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्यभरात दहीहंडीचा उत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला. या उत्सवात अनेक गोविंदा मोठ्या उत्साहाने सहभागी झाले. राज्यातील मुंबई, ठाणे, पुणे यांसारख्या अनेक शहरांत यंदाही मोठमोठ्या दहीहंड्या आयोजित करण्यात आल्या होत्या. त्याठिकाणी आयोजकांनी दहीहंडी फोडण्यासाठी लाखो रुपयांची बक्षिसे ठेवली होती. तसेच या कार्यक्रमात गोविंदांचा उत्साह वाढवण्यासाठी अनेक सेलिब्रिटींना देखील आमंत्रित करण्यात आले होते. सोबतच अनेक राजकीय नेते देखील या दहीहंडी उत्सवात सहभागी झाले होते. त्यासाठी विविध ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *