बारामती, 16 जानेवारी: (अभिजित कांबळे) बारामती विधान सभा मतदार संघात काळ्या धंद्यांना महापूर आला असून या महापूर च्या लोंढ्यात सर्व सामान्य कष्टकरी देशो धडी ला लागले आहे. या खुलेआम चालणाऱ्या दोन नंबर च्या बेकायदेशीर धंद्यांना बंद करण्याचे आदेश अजित पवार यांनी व्यासपीठावरून सर्वांसमोर आदेश दिले होते. या आदेशाचा दुरुपयोग बारामती विधानसभा मध्ये झाला आहे. पोलीस यंत्रणेने दोन नंबर वाल्यांना संरक्षण देऊन हप्त्याची रक्कम वाढवली आहे. दोन नंबरचा मालकांना सोडून देऊन पेताड खताड एजंट गिराईकांवर केसेस दाखवून कारवाईचे नवीन स्वरूप प्रकट झाले आहे.पोलीस यंत्रणेने अवैध धंद्याचे वर्गीकरण केले असून या वर्गिकर्णानुसार हप्ते गोळा करणारे कर्मचारी नियुक्त केले आहे.
जिल्हा कर्मचारी व अधिकारी पासून बिट अंमलदार, हवालदार व शिपाई पर्यंत गोळा बेरीज व वाटप चालू आहे. पांढरे माळेगाव कार्यक्षेत्रा मध्ये हिशोबनिस आहे. त्यांच्याकडे सर्व बिटचे व्यवहार निश्चित असून परवानगीचे अधिकार ही त्यांनाच आहेत. सुपे सोमेश्वर मोरगाव वडगाव भिगवण हद्दीचे मालक संदीप राव असून आदी पत्या खाली उपसम्राज्य ही संदीप च्या स्वाधीन केले असून येथील अंडरग्राऊंड चे बेताब बादशाह संदीप राव जिल्ह्यातील राज्य व केंद्रीय मार्गाचे अधिपती असून छोट्या मोठ्या पोलीस स्टेशन ग्रामीण पोलिस स्टेशनला महिन्यातून एकदा किंवा दोनदा त्याची उसुली मोहीम ऑन ड्युटी चालू असते. सुभेदार क्षीरसागर हे जिल्ह्याचे पाहरी करी आहे त्याचे सैनिक जिल्ह्याचे मटके वाले दारु वाले रासायनिक दारू वाले हातभट्टी वाले यांच्याशी कौशल्य हितसंबंध असून महिन्यातून एकदा गुपवारता भेटी गाठी सूत्र सुभेदाराच चालू असतं यातूनच जिल्ह्याला रसत पुरवली जाते. बारामती विधानसभा मतदार संघात महाराष्ट्राचे उमुख्यमंत्री यांच्या आदेशाला जर कवडी मौल किंमत असेल तर पोलीस खात्याचे व अजित दादाचे संबंध कसे असतील हा विचार न केलेला बरा.
पुणे जिल्हा ग्रामीण कुठल्या न कुठल्या गावात शहरात तालुक्यात दारू बंदी मटका बंदी उपोषणे धरणे पत्रव्यवहार आंदोलने इशारे चालूच असतात. ज्या पोलीस प्रशासन गृहमंत्र्यांचे व मुख्यमंत्र्यांचे ऐकत नाही, ज्या विधानसभा उपमुख्यमंत्री भावी पालकमंत्री यांचे पोलिस प्रशासन ऐकत नाही, त्या मतदार संघात सर्व सामान्य मतदाराचे मागणी करण्याचे काय? विषारी दारू मुळे गुटखा ड्रग्स या विषारी पदार्थामुळे तरुणाचे हाड मास खिळखिळी झाले त्याचे अंतर्गत अवयव निकामी होतात, कित्येक घरे नरक वेतना भोगून स्मशान भुमितचे अवकळा आली आहे. अश्या पुणे जिल्ह्याला कुठलाही वाली शिल्लक नसल्याचे जनता उर बडवून ताव फोडत आहे, “दादा मला वाचवा दादा मला वाचवा दाद मला वाचवा!”