‘रेमल’ चक्रीवादळाचा पश्चिम बंगालला तडाखा; वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस

कोलकाता, 27 मे: (विश्वजीत खाटमोडे) बंगालच्या उपसागरात घोंघावणारे ‘रेमल’ चक्रीवादळ बांग्लादेश आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीला धडकले आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये सध्या वादळी वारे आणि पाऊस पडत आहे. या काळात समुद्रातील चक्रीवादळाचा कमाल वेग ताशी 135 किमी नोंदवला गेला. या चक्रीवादळामुळे पश्चिम बंगालमधील अनेक भागांत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कोलकाता शहरातील अनेक भागात आज सकाळपासूनच संततधार पाऊस सुरू आहे. रेमल चक्रीवादळ जवळजवळ उत्तरेकडे आणि नंतर उत्तर-ईशान्येकडे आणखी काही काळ सरकत राहील आणि त्यानंतर हळूहळू कमकुवत होईल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

https://twitter.com/AHindinews/status/1794892392023347412?s=19

https://twitter.com/AHindinews/status/1794939539045450191?s=19

https://twitter.com/AHindinews/status/1795006002389008787?s=19

रेमल चक्रीवादळाचा तडाखा

या चक्रीवादळामुळे काल रात्रीपासून पश्चिम बंगालच्या सुंदरबन जेथे जोरदार वाऱ्यासह पाऊस सुरू झाला आहे. रेमल चक्रीवादळ सुंदरबनला धडकल्यानंतर येथील अनेक झाडे उन्मळून पडली. रेमल चक्रीवादळाच्या तडाख्याने पश्चिम बंगालच्या अलीपूर परिसरात अनेक झाडे उन्मळून पडली. सध्या तेथे एनडीआरएफच्या टीमकडून मदत आणि बचावकार्य सुरू आहे. ‘रेमल’ चक्रीवादळ भूगर्भात आल्यानंतर काल रात्री पश्चिम बंगालच्या अनेक भागात मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे वाहू लागले होते. यादरम्यान कोलकातामध्ये ‘रेमल’ चक्रीवादळामुळे शहरातील अनेक भागात पाणी साचले होते. पश्चिम बंगालचे राज्यपाल सीव्ही आनंद बोस यांनी राजभवनच्या जलद कृती दलासह ‘रेमल’ चक्रीवादळामुळे प्रभावित झालेल्या भागांना भेट दिली आणि येथील परिस्थितीचा आढावा घेतला.

https://twitter.com/AHindinews/status/1794978330048975101?s=19

एनडीआरएफ कडून बचावकार्य सुरू

पश्चिम बंगालमधील ‘रेमल’ चक्रीवादळाच्या संदर्भात पश्चिम बंगालचे डीआयजी-एनडीआरएफ मोहसीन शाहिदी यांनी सांगितले की, “भिंत कोसळल्याने एकाचा मृत्यू झाला आहे. याशिवाय झाडे पडल्याची बातमी आहे. एनडीआरएफ कडून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. या चक्रीवादळामुळे बंद करण्यात आलेली विमानसेवा पुन्हा एकदा सुरुळीत करण्यात आली आहे. तसेच काही मार्गांवर विस्कळीत झालेली रेल्वे सेवा पुन्हा एकदा सुरू काण्यात आली आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *