बारामती, 13 जुलैः (प्रतिनिधी- बाळासाहेब बालगुडे) बारामती तालुक्यातील मुर्टी गावात खाजगी कामांसाठी दिवस-रात्र सर्रासपणे मोठं मोठ्या झाडांची कत्तल होताना दिसत आहे. मात्र अवैध वृक्षतोडीकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे चित्र सध्या मुर्टी गावात आहे.
दरम्यान, उपसरपंच किरण जगदाळे यांच्या पुढाकाराने मुर्टी गावात एकीकडे वाढदिवसांनिमित्त झाडे लावण्यात येत आहे. मात्र दुसरीकडे सर्रासपणे गावात खाजगी कामांसाठी काही पर्यावरण विरोधी, आपमतलबी लोक वृक्षतोड करताना दिसत आहेत.
बारामतीत बोगस वसुली एजेंट विरोधात तक्रार दाखल
मुर्टी ग्रामपंचायत कार्यालयाच्या बाजूला एसटी स्टँड आहे. या एसटी स्टँड लगतच्या जागेत रोडच्या शेजारी असणारे मोठ मोठ्या झाडांवर काही ग्रामस्थांकडून कुऱ्हाड चालवण्याचे काम दिवस रात्र सुरु आहे. सदर वृक्षतोडीकडे ग्रामपंचायत कर्मचारी आणि सदस्यांकडून डोळेझाक होताना दिसत आहे. राजकीय हितसंबंधांसाठी गावच्या सरपंच, उपसरपंच, आणि ग्राम सदस्यांकडून याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप होत आहे.
एकीकडे झाडे लावण्याचे आवाहन तर दुसरीकडे झाडांची कत्तल करणे अशा प्रकारची कामे सध्या मुर्टी ग्रामपंचायत हद्दीमध्ये सुरु आहेत. याला आळा बसणार आहे का? असा सवाल ग्रामस्थ तुकाराम खोमणे यांनी केला आहे.
ऐन पावसाळ्यात बारामतीवर पाणी संकट!
तसेच ग्रामपंचायतीच्या मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होत आहे. या अतिक्रमणांकडे ग्रामपंचायत जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे. तसेच संबंधित अतिक्रमण काढण्यासाठी वारंवार अर्ज देऊनही कारवाई होत नसल्याचा आरोप भाजप बारामती तालुका सरचिटणीस बाळासाहेब बालगुडे यांनी केला आहे. मूर्टी गावामध्ये सध्या चालू असलेल्या अतिक्रमणाबाबत ग्रामसेवकांसह सरपंचांना वारंवार फोनवरून व प्रत्यक्ष भेटून, ग्रामसभेमध्ये विषय मांडून, अर्ज करूनही कुठल्याही प्रकारची कारवाई केल्या जात नसल्याचे बाळासाहेब बालगुडेंनी ‘भारतीय नायक’शी बोलताना सांगितले.
One Comment on “मुर्टी गावात खाजगी कामासाठी वृक्षतोड!”