जळगाव, 03 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील पाळधी गावात मंगळवारी रात्री दोन गटांमध्ये झालेल्या जोरदार वाद झाला. त्यामुळे याठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान, पाळधी गावात आता शांतता प्रस्थापित झाल्यानंतर संचारबंदी हटवण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 31 डिसेंबर 2024 रोजी रात्री 11 वाजता रस्त्यावर गाडीचालकाचा वाद झाला. या वादाच्या घटनेमुळे गावात तणाव निर्माण झाला. त्यामुळे याठिकाणी सुमारे 100 ते 150 लोक जमले आणि प्रकरणाला हिंसक वळण लागले.
https://x.com/ANI/status/1875046701956022366?t=4XW3hjcPeevzwyN6OLbzyA&s=19
शांतता प्रस्थापित झाल्यानंतर भारतीय नागरी संरक्षण संहिता (बीएनएस) च्या कलम 163 अंतर्गत संचारबंदी उठवण्यात आली आहे. सध्या गावातील जनजीवन पूर्ववत सुरू झाले असून प्रशासनाने नागरिकांना शांतता व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले आहे.
https://x.com/ANI/status/1874871699864465896?t=vW6RfKiduX-lSLtSnYy1YQ&s=19
पोलिसांनी दिली माहिती
या घटनेदरम्यान किमान 20 ते 25 लोकांनी काही दुकाने आणि 12 वाहने पेटवून दिली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप केला. गावात पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आणि शांतता प्रस्थापित करण्यात आली.
7 जण अटकेत
पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी 2 एफआयआर नोंदवण्यात आले असून हिंसाचाराच्या घटनेनंतर त्याच दिवशी 7 आरोपींना अटक करण्यात आली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आणखी 8 आरोपींची ओळख पटली असून ते अद्याप फरार आहेत. त्यांचा शोध सुरू असल्याचेही रेड्डी यांनी सांगितले.
https://x.com/ANI/status/1874872826207023584?t=R9jNbyGp09lAQ6n1aZRblA&s=19
जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले की, प्रशासनाने तत्काळ कारवाई करून नुकसान कमी होईल याची खात्री केली. “संबंधित आरोपींना अटक करण्यात आली असून पुरावे गोळा केले जात आहेत. गावकऱ्यांशी चर्चा करून भविष्यात अशी घटना घडणार नाही याबाबत त्यांची सहमती मिळाली आहे,” असेही जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी नमूद केले. तसेच त्यांनी गावातील नागरिकांना शांतता व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले.