बारामतीतील वर्दळीचा रस्ता रातोरात खोदला; प्रशासनाचे दुर्लक्ष?

बारामती, 27 मेः बारामती शहरात सर्वात जास्त वर्दळ असणाऱ्या मार्गांपैकी भिगवण रोड हा महत्त्वाचा मार्ग आहे. या रस्त्याच्या आसपास मोठ मोठे कॉलेज, शाळा, रेल्वेस्टेशन, न्यायालय, मॉल्स, कंपन्या, हॉटेल्स, नगर पालिका, बगीचा, रुग्णालय आदी रस्त्याच्या दोन बाजूच्या भागातील परिसरात आहेत. यामुळे या रस्त्यावर रात्रंदिवस दळणवळण हे सुरुच असते. मात्र हा वर्दळीचा रस्ता काही दिवसांपूर्वी कोणालाही खबर न होता रातोरात खोदाई केल्याचे आणि भराई केल्याचे  समोर आले आहे.

चिरेखानवाडी ते भोईटे वस्ती रस्त्याच्या साईट पट्टीची दुरावस्था

सदर बारामती- भिगवण रस्ता हा तीन हत्ती चौक जवळ नटराज नाट्यगृहाच्या समोरील बाजूस (बस थांबा नजिक) चुकीच्या पद्धतीने दोन्ही बाजूस खोदाई करुन साधारणतः एक ते दोन फुट भराव निर्माण केले आहे. त्यामुळे सदर भरावास अत्यंत मोठ्या गतिरोधकाचे स्वरुप प्राप्त झालेले आहे. या रस्त्यावरून जा- ये करणाऱ्यांना भरावाच्या उंचीचा अंदाज येत नसल्यामुळे छोटे मोठे अपघात होत आहेत.

जिरायत पट्ट्यातील ऊस जळून खाक; पुरंदर उपस्याचे पाणी फक्त कागदावरच

या रस्त्यावर चुकीच्या पद्धतीने अवैधरित्या खोदाई आणि भराई करणाऱ्या ठेकेदाराविरोधात चौकशी बसवावी. तसेच ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्याविरोधात कायदेशीर कारवाई व्हावी, यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे पुणे जिल्हा युवक कार्याध्यक्ष रविंद्र (पप्पू) सोनवणे यांनी सार्वजिनक बांधकाम विभाग, बारामती कार्यालयात 22 मे 2023 रोजी अर्ज केला आहे. तसेच या प्रकाराकडे जिल्हाधिकारी, बारामतीचे उपविभागीय अधिकारी, आणि बारामती नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी लक्ष घालावे, अशी विनंती केली आहे.

One Comment on “बारामतीतील वर्दळीचा रस्ता रातोरात खोदला; प्रशासनाचे दुर्लक्ष?”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *