एल्विश यादव वरून मुख्यमंत्री शिंदेंवर टीका

मुंबई, 03 नोव्हेंबर: (विश्वजीत खाटमोडे) बिग बॉस ओटीटी विजेता आणि प्रसिद्ध यूट्यूबर एल्विश यादव याच्या विरोधात रेव्ह पार्टीमध्ये सापाच्या विषाचा वापर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात नोएडा पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी गणेशोत्सवाच्या काळात एल्विश यादव हा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी गणपतीच्या दर्शनाला आला होता. यावेळी त्याने मुख्यमंत्र्यांच्या गणपतीची आरती केली होती. त्यावरून विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. याबाबत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. तसेच त्यांनी यावेळी एल्विश यादवचा वर्षा बंगल्यावरील फोटो शेयर केला आहे. या फोटोत एल्विश यादव हा मुख्यमंत्र्यांसोबत गणपतीची आरती करताना दिसत आहे.

सुनील तटकरेंचे निलंबन करा- सुप्रिया सुळे

दरम्यान, विजय वडेट्टीवार यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले की, “मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर एल्विश यादव सारख्या विषारी नशाबाजांचा सुळसुळाट… शाल नारळ देऊन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आदरतिथ्य! गणपती पूजन निमित्त राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्या एल्विश यादवला शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर बोलावून आदरतिथ्य केले होते त्याला सापाच्या विषापासून ड्रग्स बनवणे, सेवन करणे आणि विकणे यासारखा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलांबाबत अपशब्द वापरणारा, विषारी ड्रग्स चे सेवन विक्री करणाऱ्या आरोपीचे आदरतिथ्य करून मुख्यमंत्री एल्विश यादव सारख्या नशाबाज तरुणांना राज्यातील तरुणांचे रोल मॉडेल बनवण्यात हातभार लावत आहे का ? आधीच राज्यात ड्रग कारखाने सापडत आहेत, ललित पाटील शासकीय पाहुणचार झोडतो, मग पळवून लावला जातो आणि इथे वर्षा वर नशाबाज आरती करतो हे आहे महायुती सरकार.” विरोधकांच्या या टीकेमुळे मुख्यमंत्री शिंदे हे आता अडचणीत येण्याची शक्यता आहे.

ऐतिहासिक विजयासह टीम इंडियाने केले हे रेकॉर्ड!

तर, गुन्हा दाखल झाल्यापासून एल्विश यादव फरार असल्याचे बोलले जात आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, एल्विश यादव नोएडामध्ये रेव्ह पार्ट्या आयोजित करत असे. या रेव्ह पार्टीत तो सापाचे विष वापरत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच या पार्टीत परदेशी मुलींचा देखील सहभाग असल्याचे सांगितले जात आहे.

2 Comments on “एल्विश यादव वरून मुख्यमंत्री शिंदेंवर टीका”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *