बारामती, 9 एप्रिलः माजी गट शिक्षणाधिकाऱ्याच्या मुलावर आणि त्याच्या आरोपी मित्रावर बलात्कारासह विविध गंभीर आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हा हा पुण्यातील एका पीडित तरुणीने लावला आहे. सदर गुन्ह्याची नोंद ही बारामती तालुका पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे.
बारामती पंचायत समितीचे माजी शिक्षणाधिकाऱ्यांचा मुलगा राहुल जाधव (रा. बारामती) आणि त्याचा मित्र देवा सिंदकर (रा.बारामती) याच्यावर औषध देऊन बलात्कार करणे, मारहाण, शिवगाळ, जीवे मारण्याची धमकी, खंडणी, ब्लॅकमेल करणे, बळजबरीने गर्भपात करणे आदी कलमा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली आहे.
पुण्यातील पीडित तरुणी आणि आरोपी राहुल जाधव यांची ओळख फेसबुकच्या माध्यमातून झाली. या ओळखीचा फायदा घेत संशयित आरोपी राहुल जाधव ने एका व्यवसायात पार्टनरची ऑफर पीडित तरुणीला दिली. लॉकडाऊनच्या काळात खासगी नोकरी गेल्याने पीडित तरुणीने आरोपीच्या ती पार्टनरची ऑफर स्वीकरली. यामुळे ते दोघेही कामानिमित्त चारचाकी गाडीने पुण्याहून बारामतीकडे निघाले. कऱ्हावागज येथील एका लॉजमध्ये रात्री विसाव्याला थांबल्यानंतर आरोपीने पीडितेला सॉफ्ट ड्रिंकमध्ये गुंगीचे औषध देत बलात्कार केला. तसेच पीडितेचे नग्न फोटो काढून मारहाण आणि शिवीगाळ करत ब्लॅकमेल करू लागला.
त्यानंतर आरोपी राहुल जाधव याने त्याचा मित्र देवा सिंदकर याने पीडितेवर मुंबईत मद्यधुंद होत बलात्कार केला. त्यानंतर पुन्हा कऱ्हावागज येथे त्याच लॉजमध्ये बलात्कार केला. तसेच 2 लाख 38 हजार रुपये खंडणी घेतली. त्यानंतर पीडितेला दिवस गेल्याचे समजल्यावर तिला मारहाण आणि शिवगाळ करत औषध देत बळजबरीने गर्भपात केला.
आरोपीच्या त्रासाला कंटाळून पीडितेने आरोपी राहुल जाधव आणि आरोपी देवा सिंदकर याच्यावर विविध कलम अन्वये बारामती तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. या बाबतचा अधिक तापस पोलीस करीत आहे.