बारामती, 31 ऑक्टोबरः बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीचे मुख्य यार्ड येथे बुधवारी, 2 नोव्हेंबर 2022 पासुन कापसाची उघड लिलाव पद्धतीने विक्रीस सुरुवात होणार आहे. बारामती मुख्य बाजार आवारात कापूस विक्री लिलाव दर हा बुधवार आणि शनिवार सकाळी 11 वाजता होणार आहे, अशी माहिती बाजार समितीचे सचिव अरविंद जगताप आणि प्रशासक सुधाकर टांकसाळे यांनी दिली आहे.
बारामतीमधील ऊसतोडीवर पावसाच्या पाण्याचा परिणाम
यामुळे अनेक दशकांच्या विश्रांतीनंतर पुन्हा बारामतीत पुन्हा कापूस विक्रीला सुरुवात होत आहे. तरी कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला शेतमाल निवडून आणि स्वच्छ करून आणावा. तसेच कापूस शेतमाल विक्रीस आणताना शेतकऱ्यांनी मुख्य गेटवर गेट एन्ट्री करून नाव नोंदणी करण्याचे आवाहनही बाजार समितीकडून करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांना बारामती कृषि उपविभागाचे आवाहन
कापसू खरेदी विक्रीचा शुभारंभ संभाजी होळकर आणि जवाहर वाघोलीकर यांच्य हस्ते होणार आहे. सदर कार्यक्रमास शेतकरी, व्यापारी, हमाल मापाडी आणि संबंधित बाजार घटकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन बाजार समितीतर्फे करण्यात आले आहे.
2 Comments on “बारामतीत कापूस विक्री पुन्हा होणार सुरु”