दिल्ली, 6 नोव्हेंबरः (विश्वजीत खाटमोडे) आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यात दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियमवर सामना खेळविण्यात येत आहे. या सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना 49.3 षटकांत 279 धावा केल्या आहेत. यामध्ये श्रीलंकेच्या असलंका ने 105 चेंडूत 108 धावांची खेळी केली. मात्र या सामन्यात मोठा वाद झाला. त्यावेळी श्रीलंकेचा अनुभवी फलंदाज अँजेलो मॅथ्यूजला टाईम आऊट करण्यात आले. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात टाईम आऊटमध्ये बाद होणारा अँजेलो मॅथ्यूज हा पहिलाच फलंदाज ठरला आहे. यासंदर्भात बांगलादेशचा कर्णधार शाकीब अल हसनने अंपायरकडे अपील केले होते. त्यामुळे त्याच्या या कृतीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
काटेवाडीत अजित पवार गटाने मारली बाजी
दरम्यान डावाच्या 25 व्या षटकात सदिरा समरविक्रमा बाद झाल्यानंतर अँजेलो मॅथ्यूज फलंदाजीला आला. मात्र स्ट्राईक घेण्यापूर्वी मॅथ्यूजला त्याच्या हेल्मेटमध्ये काही समस्या निर्माण झाल्या. मग त्याने दुसरे हेल्मेट मागवले. याला 2 मिनिटांपेक्षा जास्त कालावधी लागला. त्यामुळे पंच आणि बांगलादेशी खेळाडूंना बराच वेळ प्रतीक्षा करावी लागली. त्यानंतर बांगलादेशचा कर्णधार शाकीब अल हसनने अंपायरकडे टाईम आऊटचे अपील केले. त्याचवेळी अंपायरने मॅथ्यूजला आऊट दिले. त्यावेळी मॅथ्यूजने अंपायर आणि शाकीब अल हसन यांच्याशी वाद घातला. त्यानंतर मॅथ्यूज रागात पॅव्हेलियनमध्ये गेला. त्यावेळी त्याने आपले हेल्मेट जमिनीवर आदळले. तर अशाप्रकारे आऊट होणारा अँजेलो मॅथ्यूज हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासातील पहिलाच खेळाडू ठरला आहे. याप्रकरणी शाकीब अल हसनच्या खिलाडूवृत्ती वर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तर मॅथ्यूज टाईम आऊट झाल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
शरद पवारांनी घेतली एकनाथ खडसे यांची भेट; केली प्रकृतीची विचारपूस
आयसीसीच्या नियमानुसार, विकेट पडल्यानंतर येणाऱ्या फलंदाजाने 2 मिनिटांत चेंडू खेळण्यासाठी तयार असणे आवश्यक आहे. तसे न झाल्यास विरोधी संघातील खेळाडू टाईम आऊटचे अपील करू शकतात. या घटनेत अंपायर फलंदाजांना बाद देखील देऊ शकतो.
One Comment on “बांगलादेश-श्रीलंका सामन्यात वाद; शाकीबच्या कृतीवर प्रश्न उपस्थित”