बुलढाणा, 1 नोव्हेंबरः (विश्वजीत खाटमोडे) राज्यात सध्या मराठा समाजाला शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन सरकारच्या वतीने करण्यात येत आहे. मात्र, अशातच, शिवसेनेच्या शिंदे गटातील एका आमदाराने यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले आहे. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आता “मराठा आरक्षणाच्या आड आल्यास त्याच्या नरडीचा घोट घेईन आणि त्याला फाडून खाईन”, असे विधान केले आहे. त्यांनी हे वक्तव्य बुलढाणा जिल्ह्यातील एका सार्वजनिक कार्यक्रमात केले आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
हसन मुश्रीफ यांच्या गाडीची तोडफोड
दरम्यान, संजय गायकवाड हे बुलढाणा जिल्ह्यातील एका सार्वजनिक कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यावेळी ते म्हणाले की, मराठा आरक्षणाच्या विरोधामुळे मराठा समाजाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे मराठा समाज हा सध्या संतप्त झाल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच राज्यात हिंसक आंदोलने केली जातायेत. मी अशा आंदोलनाचे समर्थन करत नाही. तसेच जरांगे पाटील यांनीही शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे. मराठा आरक्षण मिळाले नसल्याने मराठा समाजाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या आड जर कोणी येत असेल, तर त्याच्या नरडीचा घोट घेईन आणि त्याला फाडून खाईन.” असे संजय गायकवाड म्हणाले आहेत. तसेच मराठा समाजाने शांततेत आंदोलन करावे, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले आहे.
सणासुदीच्या काळात गॅस सिलिंडरच्या दरात वाढ
तत्पूर्वी, संजय गायकवाड यांनी याच्याआधी देखील अशाप्रकारचे प्रक्षोभक वक्तव्य केलेले आहे. काही दिवसांपूर्वी वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाड्यांची मराठा आंदोलकांनी तोडफोड केली होती. या घटनेनंतर संजय गायकवाड यांनी “याची गाडी तोडली ही शिक्षा कमी आहे. याला संपवायला पाहिजे होतं. तसं केलं असतं तर मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला असता.” असे वक्तव्य केले होते.
One Comment on “शिंदे गटाच्या आमदाराचे पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य”