बारामती, 2 एप्रिलः बारामती शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणात विकास होताना दिसत आहे. मात्र विकासाच्या नावाखाली जनसामान्याची फसवणूक होत असल्याचा धक्कादायक प्रकार आता समोर आला आहे. बारामती शहरासह तालुक्यात विविध विभागाच्या जिल्हा स्तरीय मोठ मोठ्या शासकीय इमारतींचे कामे सध्या सुरु आहेत. यातच बारामती तालुक्यातील मौजे मेडद गावाता गट नंबर 494/2 या जागेवर शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय हे होणार आहे. मात्र यावर मेडद म्हाडा प्लॉट धारक कृती समितीने आक्षेप घेतला आहे. सदर जमिनीच्या जागेवरून प्लॉट धारक कृती समितीने मोठे गंभीर आरोप केले आहे. एकीकडे विकास दाखवायचा आणि दुसरीकडे जनसामान्यांची मोठी फसवणूक करायची, असा आरोप मेडद म्हाडा प्लॉट धारक कृती समिती व सर्व भूखंड धारक, बारामती यांच्याकडून करण्यात आला आहे. या अन्यायाविरोधात मेडद म्हाडा प्लॉट धारक कृती समितीकडून 28 मार्च 2023 रोजी पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालय येथे एक दिवसीय ठिय्या आंदोलन व लाक्षणिक उपोषण देखील करण्यात आले.
मुर्टी गावात कावडीचे विधिवत पूजन
दरम्यान, बारामती तालुक्यातील मौजे मेडद गावातील गट नंबर 494/2 ही जागा म्हाडा प्राधिकरण, पुणे यांच्या नावावर होती. त्यानंतर सदर जागा ही सह जिल्हा निबंधक वर्ग-1 व जिल्हाधिकारी मुद्रांक पुणे ग्रामीण यांच्याकडे कायदेशीर नोंदणी शुल्क भरून मानीव खरेदी खताने मेडद म्हाडा प्लॉट धारक कृती समितीमधील तब्बल 206 जणांनी खरेदीखत करून विकत घेतल्याची माहिती मेडद म्हाडा प्लॉट धारक कृती समितीकडून देण्यात आली. सदर जागेची ताबा पावती नकाशासह म्हाडा प्राधिकरणच्या सक्षम अधिकारी यांच्या सही शिक्क्यानीशी दिलेला आहे. सदर जागेवर कब्जे वहिवाट अजूनही आमचाच असल्याचे मेडद म्हाडा प्लॉट धारक कृती समितीचे अध्यक्ष आनंद धोंगडे यांनी ‘भारतीय नायक’शी बोलताना सांगितले.
मुर्टीचा बाजार लिलाव पुन्हा जाहीर
आनंद धोंगडे यांनी सांगितले की, सदर जागेविषयीचे प्रकरण बारामती जिल्हा सत्र न्यायालय दावा क्र. 434/2021 आणि मुंबई उच्च न्यायालय दावा क्रमांक 3035/2022 येथे न्या प्रविष्ट आहे. तसेच त्यावर सुनावणीच्या तारखा देखील सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. सदर प्रकरण न्या प्रविष्ट असताना न्यायालयाने म्हाडा प्राधिकरणाला कुठलीही कारवाई न करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. मात्र असे असतानाही म्हाडा प्राधिकरण, बारामतीचे प्रांताधिकारी, तहसिलदार, मौजे उंडवडीचे मंडल अधिकारी आणि मौजे मेडदचे माजी गांव कामगार तलाठी यांनी परस्पर सदर जागेच्या दस्तावेज, 7/12 यावर बेकायदेशीरपणे राजकीय हस्तक्षेपाने जमीन मालकांना हरकती नोटीस न देता म्हाडा प्राधिकरणचे नाव रद्द करून शासकीय आयुर्वेदिक कॉलेज यांचे नाव नोंदल्याचा गंभीर आरोप आनंद धोंगडे यांनी केला आहे.
One Comment on “वैदकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या बांधकामात न्यायालयाचा अवमान!”