बारामतीत संविधान दिन उत्साहात साजरा

बारामती, 27 नोव्हेंबरः बारामती शहरातील भारतरत्न डॉ.बाबासाहेब पुतळा स्मारक या ठिकाणी रविवारी, 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिनानिमित्त सामुदायक त्रिसरण पंचशील व पूजा पाठाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या दरम्यान समता सैनिक दलाच्या वतीने वतीने सुरुवातीला मान वंदना देण्यात आली. त्यानंतर त्रिसरण, पंचशील ग्रहण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

बानप हद्दीत नियमबाह्य बांधकामास अभय!

या कार्यक्रमात सरोदे सर, कांबळे सर, किशोर मोरे, किरण भोसले, बापूराव लोंढे, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष सिद्धार्थ सोनवणे यांच्याकडून दिलेल्या हक्क व अधिकार तसेच संविधानाचे महत्त्व यावर्षी अनेक उदाहरणे समोर आणून संविधानांच्या बाबींवर प्रकाश टाकण्यात आले. तसेच सध्याच्या चालू घडामोडींवरती सध्या संविधानाची गरज किती महत्त्वाची आहे, हे समता सैनिक दलाच्या वतीने महत्व पटवून देण्यात आले.

शुभमन गिल गुजरात टायटन्सचा कर्णधार बनला

या सदरील कार्यक्रमास आंबेडकर जयंती महोत्सव समितीचे कार्याध्यक्ष भास्कर दामोदर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तालुकाध्यक्ष संजय वाघमारे, कांबळे गुरुजी, रामभाऊ खरात, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हा युवक कार्याध्यक्ष रवींद्र सोनवणे, अमोल वाघमारे, पुण्यशील लोंढे, किरण भोसले तसेच समता सैनिक दल आणि दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे सर्व पदाधिकारी व अन्य समाज बांधव उपस्थित होते. सदरील कार्यक्रमाची सांगता संविधानाचा विजय असो, या जयघोषात करण्यात आली. या संविधान दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन दि बुद्धिस्त सोसायटी ऑफ इंडिया, समता सैनिक दल आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव समिती यांच्या वतीने करण्यात आले होते.

One Comment on “बारामतीत संविधान दिन उत्साहात साजरा”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *