बारामती, 26 नोव्हेंबरः बारामती शहरातील भारतीय जनता पार्टीच्या संपर्क कार्यालयात आज, 26 नोव्हेंबर 2022 रोजी संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे आणि भारतीय संविधानाचे पूजन करण्यात आले. त्यानंतर संविधानाच्या प्रस्तावनेचे सामुहिक वाचन करण्यात आले.
तसेच संविधान दिनानिमित्त भाजप पदाधिकाऱ्यांकडून लोकांना संविधान प्रस्तावनेचे वाटप करण्यात आले. तसेच लोकांना संविधानाचे महत्त्व सांगितले. संविधान प्रस्तावनेचे वाटप राजेश कांबळे, अक्षय गायकवाड, शहाजी कदम, शैलेश खरात, प्रमोद डिंबळे, चंद्रकांत केंगार यांच्या कडून करण्यात आले.
सदर कार्यक्रमावेळी किशोर कानिटकर, शहाजी कदम, जी.बी गावडे, राजेश कांबळे, भारत देवकाते, अक्षय गायकवाड, साजन अडसूळ, शैलेश खरात, प्रमोद डिंबळे, संग्राम जाधव, अभिजीत पवार, प्रमोद खराडे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
One Comment on “बारामतीच्या भाजप कार्यालयात संविधान दिन साजरा”