बारामती/मुर्टी, 28 नोव्हेंबरः (प्रतिनिधी- शरद भगत) बारामती तालुक्यातील मुर्टी ग्रामपंचायत येथे 26 नोव्हेंबर (रविवारी) रोजी संविधान दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन व भारताचे संविधान या पुस्तकाचे पुजन करत संविधान उद्देशिकाचे वाचन करण्यात आले.
शिंदे समिती बरखास्त करावी, छगन भुजबळांची मागणी
या वेळी मुर्टी गावचे प्रथम नागरिक सरपंच मंगल खोमणे, उपसरपंच किरण जगदाळे, सदस्य छाया मोरे, ग्रामसेविका रोहिणी पवार यासह ग्रामस्थ उपस्थित होते. मात्र यावेळी गावकामगार तलाठी, कोतवाल, ग्रामपंचायतमधील काही सदस्य उपस्थित नव्हते. तसेच मुर्टी येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात देखील संविधान दिन साजरा केला. यावेळी सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
बारामतीत संविधान दिन उत्साहात साजरा
One Comment on “मुर्टी ग्रामपंचायतीमध्ये संविधान दिन उत्साहात साजरा”