पुण्यात साखळी बॉम्बस्फोटाचा कट

मुंबई, 7 नोव्हेंबरः (विश्वजीत खाटमोडे) पुणे शहरात साखळी बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा कट रचला होता, अशी माहिती राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) तपासात समोर आली आहे. याप्रकरणी महम्मद शाहनवाझ आलम या फरार आरोपीला एनआयएने नुकतीच अटक केली आहे. त्याने एनआयएच्या तपासात पुणे शहरात साखळी बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा कट रचला असल्याची कबुली दिली. यासाठी आपल्याला सीरियामधून सूचना दिल्या जात होत्या, असेही त्याने एनआयएच्या तपासात कबूल केले आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

मुंबईत फटाके फोडण्यावर निर्बंध घाला – मुंबई हायकोर्ट

दरम्यान यावर्षी जुलै महिन्यात पुणे शहरातील कोथरूड परिसरात शाहनवाझ आलम याच्यासह मोहम्मद इम्रान खान आणि महम्मद युनूस साकी या तिघांना दुचाकी गाडी चोरताना पुणे पोलिसांनी पकडले. तेंव्हा पोलिसांनी ते राहत असलेल्या कोंढवा परिसरातील घराची झडती घेतली. तेंव्हा शाहनवाझ आलम हा पोलिसांच्या तावडीतून सुटून पळून गेला. त्यानंतर तो गेली 4 महिने फरार झाला होता. त्याला नुकतीच एनआयएने अटक केली आहे.

बांगलादेश-श्रीलंका सामन्यात वाद; शाकीबच्या कृतीवर प्रश्न उपस्थित

तत्पूर्वी पुणे पोलिसांनी त्यांच्या कोंढवा परिसरातील घराची झडती घेतली. त्यावेळी पोलिसांनी त्यांच्या घरातून दहशतवादाशी संबंधित सामग्री जप्त केली. यामध्ये, काडतूस, पिस्तूल आणि इतर आक्षेपार्ह साहित्य सापडले होते. या दहशतवाद्यांना अटक केल्यामुळे एनआयएने पुणे पोलिसांचे कौतुक केले आहे. हे तिघे जण पुणे इसिस मॉड्यूल प्रकरणातील आरोपी आहेत. तर एनआयएने पुणे इसिस मॉड्यूल प्रकरणात आतापर्यंत 8 जणांना अटक केली आहे. सध्या त्यांची कसून चौकशी केली जात आहे. त्यामुळे त्यांच्याकडून यासंदर्भात अजून काही माहिती मिळणार का? हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.

One Comment on “पुण्यात साखळी बॉम्बस्फोटाचा कट”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *