काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेला आजपासून प्रारंभ

राहुल गांधी पत्रकार परिषदेत महाराष्ट्रातील मतदारयादीत फेरफारावर भाष्य करत आहेत.

इंफाळ, 14 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ आजपासून मणिपूरच्या थौबल येथून सुरू होणार आहे. यासाठी राहुल गांधी, अशोक गेहलोत, दिग्विजय सिंह यांच्यासह अनेक बडे काँग्रेस नेते मणिपूरमध्ये दाखल झाले आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो न्याय यात्रा आज मणिपूरच्या थौबल येथून सुरू होईल. ही यात्रा 67 दिवसांत 110 जिल्ह्यांतून 6,700 किलोमीटरहून अधिक अंतर कापणार आहे. तर आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधी भारत जोडो न्याय यात्रेला लोकांचा कसा प्रतिसाद मिळतो? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

https://twitter.com/ANI/status/1746449811417800754?s=19

भारत जोडो न्याय यात्रा या 15 राज्यातून जाणार

काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा मणिपूर, नागालँड, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्र या 15 राज्यातून जाणार आहे. तर या यात्रेचा समारोप 20 मार्च रोजी मुंबईमध्ये होणार आहे. या यात्रेसाठी राहुल गांधी हे आज मणिपूरच्या इंफाळ येथे पोहोचल्यावर कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले.

https://twitter.com/AHindinews/status/1746453698111521081?s=19

यापूर्वी भारत जोडो यात्रेला चांगला प्रतिसाद मिळाला होता 

तत्पूर्वी, काँग्रेसने राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली 7 सप्टेंबर 2022 रोजी तामिळनाडूतील कन्याकुमारी येथून भारत जोडो यात्रेला सुरूवात केली होती. तेंव्हा या यात्रेला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. या यात्रेमध्ये राहुल गांधी यांच्या लूक आणि टी-शर्टचीच जास्त चर्चा झाली होती. ही यात्रा तब्बल 5 महिन्यानंतर समाप्त करण्यात आली होती. तेंव्हा या यात्रेचा समारोप 30 जानेवारी 2023 रोजी श्रीनगरमध्ये झाला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *