खलिलाबाद, 24 मे: (विश्वजीत खाटमोडे) भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दावा केला की, या लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या पाच टप्प्यात भाजपला 310 जागा मिळतील. यावेळी काँग्रेसला 40 जागांचा टप्पा ओलांडता येणार नाही आणि समाजवादी पक्षाला 4 देखील जागा मिळणार नाहीत. उत्तर प्रदेशातील डुमरियागंजचे भाजपचे उमेदवार जगदंबिका पाल यांच्या प्रचारार्थ अमित शाह यांची खलिलाबाद येथे जाहीर सभा पार पडली. या सभेत त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
https://twitter.com/AHindinews/status/1793560823186747533?s=19
https://twitter.com/AHindinews/status/1793546261226033652?s=19
विरोधकांचा पंतप्रधान कोण?
यावेळी पाचव्या टप्प्यापर्यंत काँग्रेसला 40 जागांचा आकडाही पार करता येणार नाही आणि समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांना चार पण जागा मिळणार नसल्याचा दावा अमित शाहांनी केला आहे. तसेच नरेंद्र मोदी हे निश्चितपणे तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहेत, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. इंडिया आघाडीवर टीका करताना अमित शाह म्हणाले की, अहंकारी युती करून विरोधक पुढे सरसावले आहेत. आज मला इथून राहुल गांधींना विचारायचे आहे, याची दूरूनही काही शक्यता नाही, कारण मोदीजी पंतप्रधान होणार आहेत. पण देशातील जनतेला हे जाणून घ्यायचे आहे की, जर तुम्हाला बहुमत मिळाले तर तुमचा पंतप्रधान कोण होणार? अशा शब्दांत अमित शाह यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला.
पीओके हा भारताचा भाग
पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा भाग आहे आणि भाजप तो परत घेईल. पाकिस्तानचे नेते म्हणतात की, पीओके त्यांचा आहे, काँग्रेस नेते ही पाकिस्तानकडे अणुबॉम्ब असल्याचे सांगतात. मी त्यांना सांगतो की, भाजपवाले अणुबॉम्बला घाबरत नाहीत. पीओके हा भारताचा भाग आहे आणि राहील आणि आम्ही तो परत घेऊ, असे अमित शाह या सभेत म्हणाले.