भरतपूर, 18 नोव्हेंबरः (विश्वजीत खाटमोडे) राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष जोरदार प्रचार करत आहेत. राजस्थानमध्ये भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्ष विजयाचा दावा करत आहेत. राजस्थानमध्ये 25 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात विधानसभेच्या सर्वच्या सर्व 200 जागांसाठी मतदान होणार आहे. या निवडणूकीचा निकाल 3 डिसेंबर रोजी लागणार आहे. तर राजस्थानच्या भरतपूरमध्ये आज पंतप्रधान मोदी यांची भव्य रॅली पार पडली. यावेळी मोदी यांनी काँग्रेस पक्षावर जोरदार निशाणा साधला. “काही लोक स्वतःला जादूगार म्हणतात. जनता आता 3 डिसेंबर रोजी काँग्रेसला छू मंतर करणार आहे.” अशाप्रकारे नरेंद्र मोदी यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यावर टीका केली.
धनगर समाजाच्या वतीने आज इंदापूर बंद
या सभेत पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेस पक्षावर हल्लाबोल केला. “राजस्थानमध्ये गेल्या पाच वर्षांत काय झाले? इथल्या विनाशाच्या पाठीमागे कोण आहे? काँग्रेसने राजस्थानला गरिबी, गुन्हेगारी आणि दंगलीत आघाडीवर केले आहे. आता जनता म्हणत आहे की, जादुगाराला मते देणार नाही. सर्वसामान्यांच्या जीवाचे आणि मालमत्तेची रक्षण करणे ही काँग्रेसची जबाबदारी होती. मात्र गेल्या 5 वर्षांत दलित आणि महिलांवर सर्वाधिक अत्याचार झाले. राजस्थानमध्ये हनुमान जयंती असो की होळी, कोणताही सण शांततेत साजरा होऊ शकला नाही. याठिकाणी कर्फ्यू, दंगली, हे सगळं चालूच होते. काँग्रेस जिथे येते तिथे विनाशच आणते. राजस्थानमध्ये दहशतवाद आणि गुन्हेगारीत वाढ होेत चालली आहे.” असे नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.
ठाकरे गटाचे शिष्टमंडळ आज राष्ट्रपतींना भेटणार
पंतप्रधान मोदींनी यावेळी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यावरही निशाणा साधला. “जे मुख्यमंत्री म्हणतात की, महिला बलात्काराचे खोटे गुन्हे दाखल करतात. ते महिलांचे संरक्षण करणार का? काँग्रेस नेत्यांना काय झाले आहे? अशा जादूगाराला एक मिनिट सुद्धा खुर्चीवर बसण्याचा अधिकार आहे का? त्याने आता निरोप घ्यावा की नाही? महिलांबाबत काँग्रेसची विचारसरणी किती खालावली आहे, हे त्यांच्या वक्तव्यावरून दिसून येते. तसेच काँग्रेसच्या एका मंत्र्याने म्हटले की, राजस्थान हे पुरुषांचे राज्य असल्याने तेथे बलात्कार होत आहेत. अशा विचारसरणीच्या काँग्रेस नेत्यांनी बुडून मरावे. येथील पुरुष आपल्या बहिणी आणि मुलींची इज्जत वाचवण्यासाठी मागे हटत नाहीत. काँग्रेसच्या जादूगाराच्या आवडत्या मंत्र्याच्या अशा विधानाची त्याला लाज वाटायला हवी.” अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यावर हल्लाबोल केला.
One Comment on “3 डिसेंबरला राजस्थानमधून काँग्रेस हद्दपार होणार – नरेंद्र मोदी”