बारामती, 21 एप्रिलः राज्यभरात कृषि बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकींचा कार्यक्रम सध्या सुरु आहे. अनेक उमेदवारांनी विविध कृषि बाजार समितीत उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. अर्ज छाणणीतून तसेच माघारी अर्ज घेतल्यानंतर 21 एप्रिल 2023 रोजी निवडणूक चिन्ह वाटपाचा कार्यक्रम पार पडला. मात्र बारामती कृषि बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या चिन्ह वाटपात घोळ झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
वडगांव निंबाळकर येथे इफ्तार पार्टीचे आयोजन
हनुमंत भरणे यांनी बारामती कृषि बाजार समितीच्या हमाल मापाडी मतदार संघातून आपला अपक्ष अर्ज भरला आहे. उमेदवार हनुमंत भरणे यांनी नामनिर्देशित अर्ज भरताना पसंतीचे पतंग, नारळ व गॅस सिलेंडर या निवडणूक चिन्ह्यांची मागणी केली. मात्र कृषि बाजार समितीचे निवडणूक अधिकार तथा सहाय्यक निंबधक, बारामती सहकारी संस्था यांनी परस्पर ‘किटली’ हे निवडणूक चिन्ह दिल्याचा आरोप बारामती कृषि बाजार समिती हमाल मापाडी मतदार संघाचे उमेदवार हनुमंत भरणे यांनी केला आहे.
मुर्टी ग्रामपंचायतीत लटकवलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोचे पूजन
माझ्याबरोबर कोणतीही चर्चा न करता, माझी संमती न घेता, कोणाच्या तरी राजकीय प्रभावाने परस्पर मी मागणी केली नसतानाही किटली हे चिन्ह दिले आहे. यामुळे माझे निवडणूक लढवण्याचा संविधानिक अधिकाराचा भंग झाला असल्याचे हमाला मापाडी मतदार संघाचे उमेदावर हनुमंत भरणे यांनी भारतीय नायकशी बोलताना सांगितले. तसेच मी मागणी केलेले नारळ, गॅस सिलेंडर, पतंग या तिन्ही चिन्हांपैकी एक मला देऊन माझा संविधानिक अधिकार अबाधित ठेवावा, व मला हमाल मापाडी मतदार संघातून लढविण्यासाठी पतंग हे चिन्ह मिळावे, अन्यथा संविधानिक मार्गाने आंदोलन करेन, असा इशारा भरणे यांनी दिला आहे.
One Comment on “सहाय्यक निंबधकांकडून चिन्ह वाटपात घोळ?”