एलपीजी सिलिंडरच्या दरात घट; घरगुती सिलिंडरचे दर स्थिर

19 किलो व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडर

दिल्ली, 01 जून: (विश्वजीत खाटमोडे) इंडियन ऑईलने व्यावसायिक वापरासाठी वापरल्या जाणाऱ्या 19 किलो वजनाच्या एलपीजी सिलिंडरच्या दरात घट केली आहे. देशातील दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नईसह प्रमुख शहरांमध्ये या सिलिंडरचे दर आजपासून सुमारे 24 रुपयांनी कमी झाले आहेत. मात्र, घरगुती वापरासाठी असलेल्या 14.2 किलो वजनाच्या एलपीजी सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

https://x.com/ANI/status/1928851171684364664?t=_7UaB8XYC8eK-fbRVwLshQ&s=19

पहा नवे दर

इंडियन ऑईलने जाहीर केलेल्या नव्या दरांनुसार, दिल्लीमध्ये 19 किलोचा एलपीजी सिलिंडर आता 1723.50 रुपये दराने मिळणार असून, यापूर्वी त्याची किंमत 1747.50 रुपये होती. म्हणजेच दिल्लीतील दरात 24 रुपये घट झाली आहे.

कोलकाता येथे हा सिलिंडर पूर्वी 1851.50 रुपये दराने मिळत होता, तर आता त्याची किंमत 1826 रुपये झाली आहे. मुंबईमध्ये दर 1699 रुपये वरून 1674.50 रुपये इतका झाला आहे. चेन्नईमध्येही दर 1906 रुपये वरून कमी होऊन 1881 रुपये इतका झाला आहे. हे नवे दर 1 जूनपासून लागू झाले आहेत.

घरगुती सिलिंडरचे दर स्थिर

दरम्यान, घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत यावेळी कोणताही बदल करण्यात आलेला नाही. 14.2 किलो वजनाचा घरगुती एलपीजी सिलिंडर पूर्वीप्रमाणेच जुन्या दरातच उपलब्ध राहील, अशी माहिती तेल कंपन्यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *