जालना, 29 ऑक्टोबरः (विश्वजीत खाटमोडे) राज्यात सध्या मराठा आरक्षणाची मागणी जोर धरू लागली आहे. यासंदर्भात मनोज जरांगे पाटील हे 25 ऑक्टोंबरपासून पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. यावेळी जरांगे पाटलांनी पत्रकारांशी संवाद साधला. जोवर मला बोलता येत आहे, तोवर तुम्ही चर्चेला या. नंतर येऊन काही काहीच फायदा होणार नाही, असे जरांगे पाटील यांनी यावेळी म्हटले आहे.
केरळमध्ये ख्रिश्चन समुदायाच्या कार्यक्रमात 3 स्फोट
दरम्यान, काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षण संदर्भात कॅमऱ्यासमोर चर्चा होत नसते. समोर येऊन चर्चा केली पाहिजे, असे म्हटले होते. त्यावर बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, “मग काय त्यांच्या कानात बोळे घातले का? काल काय सांगितलं मी मराठे चर्चेला येण्यासाठी अडवणार नाहीत. फक्त आज-उद्या एकदाचं चर्चेला या. मला बोलता येतंय तोपर्यंत या, नंतर येऊन काय उपयोग नाही. फक्त येथे प्रत्यक्ष येऊन सांगा तुम्हाला चर्चा करायची आहे की नाही. बाकीची वळवळ करायची नाही. आता सरकारला दोनच पर्याय आहेत. एकतर त्यांनी मराठा समाजाला आरक्षण द्यायचं किंवा मराठ्यांशी शांततेत सामना करायचा. आणखी दुसरा कोणताच पर्याय त्यांच्याकडे राहिला नाही. या आमरण उपोषणाचा हा दुसरा टप्पा सुरू आहे. हे उपोषण शांततेत सुरू आहे. मराठा समाजाला आरक्षण हे मिळणारच आहे. त्यामूळे मराठ्यांनी गडबड करू नये. मी मराठा समाजाला सांगू इच्छितो की, मराठा आरक्षण जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत तुमचे हे पोरगं मागे हटणार नाही. काळजी करू नका. तुम्ही फक्त शांततेत आंदोलन करा. मी आता मागे हटत नाही, काही झालं तरी हटत नाही.” असे जरांगे पाटील यावेळी म्हणाले.
अजित पवारांना डेंग्यूची लागण
तत्पूर्वी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा मराठा समाजाला न्याय देणार असल्याचे म्हटले आहे. मराठा समाजाला आरक्षण देणार, असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. मराठा समाजाने सरकारला समजून घ्यावे. मराठा समाजातील तरुणांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये. तसेच जरांगे पाटील यांच्या तब्येतीची आम्हाला काळजी आहे. असे ते म्हणाले. मराठा आरक्षण कोर्टात टिकावे, यासाठी राज्य सरकार कायदेशीर बाबींवर काम करीत आहे, अशी माहिती देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिली.
One Comment on “मला बोलता येतंय तोपर्यंत चर्चेला या – जरांगे पाटील”