बारामती, 29 ऑक्टोबरः बारामती शहराच्या सौंदर्यात भर घालणारी नगर परिषद, बारामतीची सुसज्ज आणि अद्यावत वाटणारी इमारत किती निकृष्ट दर्जाची आहे, हे आता स्पष्ट झाले आहे. बारामती नगर परिषदेच्या नूतन इमारतीचा स्लॅब कोसळल्याचा व्हिडीओ भारतीय नायकच्या कॅमेऱ्याने टिपला आहे.
दरम्यान, 2015 मध्ये 60 वर्षांचं आयुर्मान असलेल्या बानपच्या सुसज्ज आणि अद्यावत इमारतीमध्ये अनेकदा डागडुजी करण्यात आली आहे. कोट्यावधी रुपये खर्च करून बांधलेली इमारत पावसाळ्यात गळते आहे. तर अनेक ठिकाणी प्लास्टरला तडे गेले आहेत. अनेक पिलरमधून पाणी पाझरत आहेत.
निरंकारी संत समागम पूर्व तयारी अंतिम टप्प्यात
त्यातच 28 ऑक्टोबर 2022 रोजी सायंकाळी 6 च्या सुमारास बानपच्या इमारतीमधील पोर्चमध्ये प्लास्टर कोसळून कर्मचाऱ्याला दुखापत होता होता राहिली. सदर इमारतीचे बांधकाम रुपेश भादुले यांच्या मालकीचे मे. सिद्धी कन्स्ट्रक्शन, पुणे यांच्या वतीने करण्यात आले असून अॅस्टयुट इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. हे सल्लागार अभियंता आहेत. मात्र इतके निकृष्ट दर्जाचे काम केले असतानाही ठेकेदारावर बानप का मेहरबान आहे, हे समजण्या पलीकडे आहे.
सार्थक फौंडेशनची 110 मुलांसोबत दिवाळी साजरी
बारामती नगर परिषदेची सुसज्ज आणि अद्यावत इमारत ही विकासाच्या मॅडेलचा एक उत्कृष्ट नमुना आहे. यातून नागरीक, प्रशासन आणि सत्ताधारी काय चांगला बोध घेतील, असे मतदार अपेक्षा व्यक्त करीत आहे.
One Comment on “बारामती नगर परिषदेच्या नुतन इमारतीचा कोसळला भाग?”