पुणे, 26 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून चांगलाच गारठा वाढला आहे. तर राज्यात रात्रीनंतर तापमानात मोठी घट होताना दिसत आहे. अशातच येत्या 31 डिसेंबरपर्यंत राज्यात थंडीचा जोर असाच कायम राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 31 डिसेंबर पर्यंत विदर्भ, मध्य महाराष्ट्रासह पुणे, नगर आणि मुंबई ठाण्याच्या काही भागांमध्ये तापमानात घट होण्याची शक्यता आहे. असे हवामान विभागाने म्हटले आहे.
https://twitter.com/Hosalikar_KS/status/1739286820452499582?s=19
राज्यात थंडीचा जोर कायम
महाराष्ट्रात देखील आजच्या दिवशी चांगलीच पडली होती. सातारा येथे आज 14.2 अंश सेल्सिअस, सांगली 15.2, नांदेड 13.5, नाशिक 12.6, अहमदनगर 10.3, बीड 13.5, मुंबई 18.7, छत्रपती संभाजीनगर 12.6, डहाणू 18.6, पुणे 12.3, मालेगाव 13.6, परभणी 13.2 आणि नागपूरात 14.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
https://twitter.com/Hosalikar_KS/status/1739488447918751888?s=19
पाहा पुणे जिल्ह्यातील शहरांचे तापमान
दरम्यान आज सकाळी पुणे शहरासह जिल्ह्यात कमालीची थंडी जाणवत होती. यामध्ये पुणे जिल्ह्यात पाषाण परिसरात सर्वात निचांकी तापमानाची नोंद झाली आहे. पाषाण परिसरात आज 11.3 अंश सेल्सिअस इतके कमी तापमान नोंदवले गेले आहे. तर आज सकाळी लोणावळा येथे 19.7 अंश सेल्सिअस, लवळे 18.4, खेड 18.3, मगरपट्टा 17.4, चिंचवड 17.1, भोर 16.9, कोरेगाव पार्क 16.8, गिरीवन 16.5,
https://twitter.com/Hosalikar_KS/status/1739507700319588418?s=19
तर बल्लाळवाडी 16, दापोडी 15.4, दुदुळगाव 15, लवासा 15, पुरंदर 14.9, राजगुरुनगर 14.2, निमगिरी 14, तळेगाव 13.8, आंबेगाव 13.6, इंदापूर 13.4, तळेगाव ढमढेरे 13.4, नारायणगाव 13.2, दौंड 12.8, शिवाजीनगर 12.3, माळीण 12, बारामती 11.8, शिरूर 11.8, खडकवासला 11.8, हवेली 11.7 आणि पाषाण परिसरात 11.3 इतक्या तापमानाची नोंद झाली आहे.