मुंबई विमानतळावर करोडो रुपयांचे कोकेन जप्त; परदेशी महिलेला अटक

मुंबई, 25 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) मुंबई विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) परदेशी महिलेकडून 19 कोटी 79 लाख रुपयांचे कोकेन जप्त केले आहे. याप्रकरणी डीआरआयने सबंधित महिलेला अटक केली असून, तिच्या विरोधात एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई काल करण्यात आली. दरम्यान, ही महिला नैरोबीहून मुंबई विमानतळावर आली होती. तिच्याकडे सिएरा लिओन देशाचे नागरिकत्व आहे.

https://twitter.com/ANI/status/1772159232424435770?s=19

करोडो रुपयांचे कोकेन जप्त

मुंबई विमानतळावर एक महिला मोठ्या प्रमाणात कोकेन घेऊन येणार असल्याची माहिती डीआरआयला मिळाली होती. या गुप्त माहितीच्या आधारे डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी या परदेशी महिलेला रोखले. यावेळी त्यांनी या महिलेच्या सामानाची झडती घेतली. ह्या तपासणीत सबंधित महिलेच्या सामानामध्ये त्यांना मोठ्या प्रमाणात कोकेन आढळून आले. धक्कादायक बाब म्हणजे, ह्या तपासणीत सबंधित महिलेच्या बॅग मधील बाटल्या आणि शूजमध्ये पांढऱ्या पावडरसारखे काहीतरी लपवून ठेवल्याचे आढळून आले. यावेळी डीआरआयने तिच्याकडून 19 कोटी 79 लाख रुपयांचे कोकेन जप्त केले.

याप्रकरणी सबंधित महिलेला अटक करण्यात आली असून, तिला आता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, या महिलेच्या बॅगमध्ये शूज, मॉइश्चरायझरच्या बाटल्या, शॅम्पू आणि दुर्गंधीनाशकाच्या बाटल्या आदी वस्तू होत्या. या वस्तू जड असल्याचे डीआरआय अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *