मुंबई, 21 मे: (विश्वजीत खाटमोडे) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. यंदा राज्यात 93.37 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यावर्षी बारावीची परीक्षा फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात घेण्यात आली होती. राज्यातील एकूण 14 लाख 23 हजार 970 विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. त्यातील 13 लाख 29 हजार 684 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदाच्या बारावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे. राज्यात बारावीच्या परीक्षेत 95.4 टक्के मुली पास झाल्या आहेत. तसेच बारावीच्या परीक्षेत 91.60 टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेचा निकाल शिक्षण मंडळाने आज ऑनलाईन पद्धतीने जाहीर केला आहे.
कोणत्या विभागाचा किती निकाल?
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या 9 विभागीय मंडळांमार्फत यंदा बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. यामध्ये राज्यात कोकण विभागाचा निकाल 97.51 इतका सर्वाधिक निकाल लागला आहे. तर मुंबई विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे 91.95 टक्के इतका लागला आहे. शिक्षण विभागाने प्रत्येक विभागाची टक्केवारी जाहीर केली आहे. यामध्ये कोकण – 97.51 टक्के, नाशिक – 94.71 टक्के, पुणे – 94.44 टक्के, कोल्हापूर – 94.24 टक्के, संभाजी नगर – 94.08 टक्के, अमरावती – 93 टक्के, लातूर – 92.36 टक्के, नागपूर – 92.12 टक्के आणि मुंबई विभागाचा निकाल 91.95 टक्के इतका लागला आहे.
या वेबसाईटवर निकाल पाहता येईल
http://www.mahresult.nic.in
http://hscresult.mkcl.org
http://www.mahahsscboard.in
https://results.digilocker.gov.in
http://www.tv9marathi.com
http://results.targetpublications.org