इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर! राज्यातील 95.81 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

पुणे, 27 मे: (विश्वजीत खाटमोडे) महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष या निकालाकडे लागले होते. अखेर आज त्यांची प्रतीक्षा संपली आहे. यंदा राज्यात इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल 95.81 टक्के इतका लागला आहे. यंदा दहावीच्या परीक्षेसाठी राज्यातील 15 लाख 60 हजार 154 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील 14 लाख 84 हजार 441 विद्यार्थी पास झाले आहेत. गेल्यावर्षी पेक्षा यंदा निकाल 1.98 टक्क्यांनी वाढला असून यावर्षीही मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण अधिक आहे. राज्यात मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी 97.21 टक्के इतकी आहे, तर 94.56 टक्के इतकी मुलं उत्तीर्ण झाली आहेत.

https://twitter.com/airnews_mumbai/status/1795022682401952094?s=19

https://twitter.com/ddsahyadrinews/status/1794987105606672799?s=19

कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल

इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल आज दुपारी एक वाजता शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या अधिकृत संकेतस्थळांवर ऑनलाईन पद्धतीने जाहीर झाला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत दहावीची परीक्षा यंदा मार्च 2024 मध्ये घेण्यात आली होती. यामध्ये कोकण विभागाचा सर्वाधिक 99.01 टक्के इतका निकाल लागला आहे. तर नागपूर विभागाचा सर्वात कमी 94.73 टक्के इतका निकाल लागला आहे. याशिवाय पुणे – 96.44 टक्के, नागपूर – 94.73 टक्के, छत्रपती संभाजीनगर – 95.19 टक्के, मुंबई – 95.83 टक्के, कोल्हापूर – 97.45 टक्के, अमरावती – 95.58 टक्के, नाशिक – 95.28 टक्के, लातूर – 95.27 टक्के, आणि कोकण विभागाचा निकाल 99.01 टक्के इतका लागला आहे.

या वेबसाईटवर निकाल जाहीर

हा निकाल ऑनलाईन स्वरूपात जाहीर झाला असून, दहावीच्या विद्यार्थ्यांना या परीक्षेचा निकाल शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या अधिकृत संकेतस्थळावरून पाहता आणि डाऊनलोड करता येणार आहे.

https://mahresult.nic.in
http://sscresult.mkcl.org
https://sscresult.mahahsscboard.in
https://results.digilocker.gov.in
https://results.targetpublications.org
https://www.tv9marathi.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *