इयत्ता दहावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर; ‘या’ दिवशी निकाल लागणार

पुणे, 25 मे: (विश्वजीत खाटमोडे) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर आज करण्यात आली आहे. त्यानुसार, इयत्ता दहावीचा निकाल येत्या 27 मे रोजी जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत दहावीची परीक्षा यंदा मार्च 2024 मध्ये घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल शिक्षण मंडळाचे सांगितलेल्या अधिकृत संकेतस्थळांवर 27 मे रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहे. याची माहिती राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली आहे.



दरम्यान, इयत्ता दहावीच्या विद्यार्थांना त्यांनी मिळवलेले विषयनिहाय गुण शिक्षण मंडळाने सांगितलेल्या संकेतस्थळांवर पाहता येणार आहेत. तसेच या संकेतस्थळांवरून विद्यार्थ्यांना त्यांच्या निकालाची प्रिंट आउट देखील काढता येणार आहे. https://mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालासोबत निकालाबाबतची इतर सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल. तसेच https://mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.



या वेबसाईटवर निकाल जाहीर होणार

https://mahresult.nic.in
http://sscresult.mkcl.org
https://sscresult.mahahsscboard.in
https://results.digilocker.gov.in
https://results.targetpublications.org
https://www.tv9marathi.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *