उद्या लागणार इयत्ता 10 वीचा निकाल!

पुणे, 1 जूनः राज्यातील इयत्ता दहावीचा निकाल उद्या 2 जून 2023 रोजी लागणार असल्याचे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (एमएसबीएसएचएसई) सांगितले आहे. विद्यार्थ्यांना दहावीचा निकाल उद्या 2 जूनला दुपारी 1 वाजता बोर्डाच्या बेवसाईटवर पाहता येणार आहे. प्राप्त माहितीनुसार mahahsscboard.in वर ऑनलाईन पाहता येईल. याशिवाय mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटवर देखील निकाल उपलब्ध असेल.

ग्रामपंचायत आणि पंचायत समितीविरोधात भाजपकडून उपोषणाचा इशारा

दरम्यान, दहावीची लेखी परीक्षा 2 ते 25 मार्च 2023 या कालावधीत पुर्ण झाल्या. यंदा राज्यातील तब्बल 15 लाख 77 हजार 256 विद्यार्थ्यांनी परीक्षा फॉर्म भरले होते. यामध्ये 84 हजार 416 मुले तर 73 हजार 62 मुली आहेत.

प्रशासनाकडून आहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन

दहावीची परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध होणार असल्याची माहिती एमएसबीएसएचएसई ने दिली आहे. तसेच उद्या, शुक्रवारी 2 जून 2023 रोजी सकाळी 11 च्या सुमारास एमएसबीएसएचएसई ची पत्रकार परिषद घेणार असल्याचे सांगितले आहे.

One Comment on “उद्या लागणार इयत्ता 10 वीचा निकाल!”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *