बारामतीत महिलांसह दोन गटात तुंबळ हाणामारी

बारामती, 12 जानेवारीः बारामती शहरातील अनंत नगर आंबेडकर वसाहत येथे किरकोळ कारणावरून 11 जानेवारी 2023 रोजी सायंकाळी 7 च्या सुमारास महिलांसह दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. या घटनेनंतर बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये परस्पर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून, 11 जानेवारी सायंकाळी आमराई भागातील आनंदनगर येथे दोन गटात हाणामारी झाल्याची माहित मिळाली. माहिती मिळताच तात्काळ सदर ठिकाणी पोलीस पथक पोहोचले. त्यावेळी दोन गटात भांडणे चालू होती. त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये महिलांचा समावेश होता. पोलीस परिस्थिती शांत करत असताना महिला पोलिसांच्या गाडीला सुद्धा आडव्या जात होत्या.

बारामतीच्या तहसिल कार्यालयात सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक लूटमार

त्यातील काही लोकांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन येथे आणून गु.र. नंबर 21/ 23 भादवी 143, 147, 149, 354, 324, 323, 427, 327, 504, 506 तसेच महाराष्ट्र पोलीस ऍक्ट 135 प्रमाणे आरोपी नामे धनंजय तेलंगे, ऋषिकेश तेलंगे, रोहित तेलंगे, चिंट्या सुतार, मयूर सुतार, तुषार शिंदे, करण शिंदे, गोविंद तेलंगे, बबलू कसबे, करण दिवटे (सर्व रा. आंबेडकर वसाहत आमराई बारामती) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

तसेच येथील दुसरा गट यांच्यावर गु.र. नंबर 22/ 2023 भादवी कलम 143, 147, 149, 354, 324, 327, 323, 504, 506, तसेच महाराष्ट्र पोलीस 135 प्रमाणे आरोपी नामे करण सकट, श्याम सकट, निलेश सकट, बेबीताई सकट, बेबीताई सकटची मुलगी रेश्मा पूर्ण माहित नाही (सर्व रा. साळवे नगर अमराई जिल्हा पुणे) यांचे वर परस्परविरोधी गुन्हे दाखल केला.

बारामतीमधील हातभट्टी हद्दपार? रासायनिक दारूच्या विळख्यात तालुका!

यासह मारामारी करून दोन्ही गटांनी महिला तक्रारदार पुढे करून विनयभंगासह दंगलीचा गुन्हे दाखल केलेले आहे. या वसाहतीत किरकोळ कारणावरून वारंवार दंगल सदृश्य गुन्हे रात्रीच्या वेळेस घडतात. याबाबत नागरिक त्रस्त आहेत. यापुढे गंभीर गुन्हे दाखल करून सदर भागात या प्रकारे गुन्हे करणाऱ्यांचा रेकॉर्ड तयार करून त्यांना तडीपार करणार आहे.

One Comment on “बारामतीत महिलांसह दोन गटात तुंबळ हाणामारी”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *