अकोला, 08 ऑक्टोंबर: (विश्वजीत खाटमोडे) अकोला शहरात दोन गटात हाणामारी झाली. त्यामुळे अकोला येथे मोठ्या तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अकोला शहरातील हरिहर पेठ परिसरात एका ऑटो चालकाने दुचाकी चालकाला धडक दिली. त्यावरून हा वाद निर्माण झाला. काही वेळातच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. याठिकाणी पोलिसांनी मोठ्या प्रमाणात सुरक्षा वाढविली जाते. त्यामुळे या परिसरात सध्या शांततेचे वातावरण आहे.
https://x.com/ANI/status/1843362912855081419?t=bUIsqFW2qV-4F8Kget7RTg&s=19
सध्या परिस्थिती नियंत्रणात
दरम्यान, अकोल्यातील हरिहर पेठ परिसरात सोमवारी (दि.07) एका ऑटो चालकाने दुचाकी चालकाला धडक दिली. हे ऑटो आणि दुचाकी चालक दोघेही वेगवेगळ्या समाजाचे आहेत. या घटनेनंतर या दोघांत मोठा वाद झाला. त्यावेळी दोन्ही बाजूंनी लोक जमा झाले. त्यानंतर या जमावाने दोन्ही दोन्ही वाहने जाळली. तसेच त्यांनी एकमेकांना मारहाण आणि दगडफेक देखील केली. त्यामुळे हा वाद आणखी विकोपाला गेला. या दगडफेकीत अनेकजण जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. यावेळी पोलिसांनी जमावाला त्यांच्या शांत करून ही परिस्थिती आटोक्यात आणली. आम्ही परिसरात सतत गस्त घातली आहे. या प्रकरणात सहभागी असलेल्या लोकांवर कठोर कारवाई केली जाईल, असे अकोल्याचे पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी एएनआय शी बोलताना सांगितले आहे.
https://x.com/ANI/status/1657583691328274432?t=Tz5j7ZJoj4UC639wJduHdw&s=19
यापूर्वी ही दोन गटात वाद झाला होता
तत्पूर्वी, अकोला शहरात 14 मे 2023 रोजी दोन गटात किरकोळ वादातून हाणामारी झाली होती. त्यावेळी हिंसक झालेल्या जमावाने काही वाहनांचे नुकसान करून अनेक वाहने जाळली होती. त्यानंतर पोलिसांनी ही परिस्थिती नियंत्रणात आणली आणि अकोला शहरात कलम 144 लागू केले होते. तसेच यावेळी पोलिसांनी याप्रकरणात अनेक लोकांना ताब्यात घेतले होते.