इंदापूर, 8 डिसेंबरः इंदापूर तालुक्यातील बावडासह परिसरातील गावांमध्ये नागरीकांनी 7 डिसेंबर 2022 रोजी सुर्याची दोन प्रतिबिंब अनुभवता आली. बुधवीरी दुपारनंतर सूर्य मावळतीला जात असताना आकाशातील धुकेसदृश असलेल्या ढगांमधील पाण्याच्या कणांचे परावर्तन होऊन आकाशात नागरीकांना सूर्याची दोन प्रतिबिंबे पहावयास मिळाली. सुर्याच्या दोन प्रतिबिंबांचे अनोखे दृश्य पहावयास मिळाल्याचा आनंद नागरीकांनी लुटला.
आजपासून शरद कृषी महोत्सवाला सुरुवात
दरम्यान, बुधवारी सकाळपासून दिवसभर आकाशात धुकेसदृश असे ढगाळ वातावरण निर्माण झालेले होते. त्यामुळे सूर्य निस्तेज दिसत होता. नेहमीच्या तुलनेत सुर्याच्या प्रकाशाची तीव्रता ही निम्म्याने कमी जाणवत होती. परिणामी 7 डिसेंबर रोजी दिवसभर नागरिकांना उन्हाची तीव्रता जाणवली नाही. उलट शिरवाळसदृश वातावरण दिवसभर दिसत होते.
शरदचंद्र पवार इन्स्पायर फेलोशिपसाठी अमोल घोडके यांची निवड
One Comment on “नागरीकांनी अनुभवली सुर्याची दोन प्रतिबिंब!”