बारामती येथील कोअर हाऊस मधील मुलांनी घेतला रंगपंचमीचा आनंद!

बारामती, 31 मार्च: देशाच्या अनेक भागांत रंगपंचमीचा सण साजरा केला जातो. देशभरात काल रंगपंचमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे. यावेळी ठिकठिकाणी लहान मुले, तरूण आणि इतर लोक रंग खेळताना आणि रंगांची उधळण करताना दिसत होते. सोबतच ढोल-ताशांच्या गजरात तरूण आणि लहान मुले रस्त्यांवर मस्ती करताना पाहायला मिळाले. राज्यातील बारामती शहरात देखील यंदा रंगपंचमीचा सण मोठ्या आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी बारामती शहरातील कोअर हाऊस येथे रंगपंचमी सणाचे आयोजन करण्यात आले होते. याठिकाणी मुलांनी रंगपंचमीचा मनसोक्त आनंद लुटला.

पाहा व्हिडिओ –

 



यामध्ये तरूण वर्ग तसेच लहान मुलांनी एकमेकांना रंग लावला. तसेच या मुलांनी याठिकाणी साऊंड सिस्टीमच्या तालावर डान्स केला सोबतच त्यांनी रंगांची उधळण केली. यावेळी सर्वांनी एकच जल्लोष केला. याप्रसंगी, बारामती शहरातील मुले खूपच आनंदी दिसत होती. रात्री उशीरापर्यंत हा कार्यक्रम चालला. तोपर्यंत या मुलांचा उत्साह तसाच कायम होता. यावेळी ह्या मुलांनी खूप मज्जा आणि मस्ती केली.



दरम्यान, देशाच्या अनेक भागांत काल रंगपंचमी पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यात आली. काल रंगपंचमीसाठी तरूण वर्गाकडून जय्यत तयारी करण्यात आली होती. यावेळी देशातील अनेक ठिकाणी लहान मुलांपासून ते आबाल वृद्धांपर्यंत सर्वजण एकमेकांना रंग लावून गाण्यांच्या ठेक्यावर नृत्य करताना दिसले. यामध्ये काही ठिकाणी महिलांचा देखील सहभाग होता. तसेच रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी देशातील काही महत्त्वाच्या शहरांमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *