मुंबई, 9 नोव्हेंबरः (विश्वजीत खाटमोडे) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज त्यांच्या वर्षा या निवासस्थानी राज्यातील वायू प्रदूषणासंदर्भात आढावा बैठक बोलावली होती. या बैठकीत मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्यासह सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलिस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते. तसेच मुंबई महापालिका आयुक्त आय. एस. चहल, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनिषा म्हैसकर, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त संजय मुखर्जी, पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव प्रविण दराडे, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव गोविंदराज, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन शर्मा, परिवहन विभागाचे प्रधान सचिव पराग जैन हे या बैठकीला प्रत्यक्ष उपस्थित होते.
बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ
या बैठकीत मुख्यमंत्री शिंदे यांनी सबंधित अधिकाऱ्यांना प्रदूषणासंदर्भात विविध सूचना दिल्या. तसेच हवेची गुणवत्ता निर्देशांक सुधारण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाय योजना ॲक्शन मोडवर राबवाव्यात, असे निर्देश त्यांनी दिले आहेत. यासोबतच, सर्व प्रशासकीय यंत्रणांनी एकत्रितपणे प्रदूषणमुक्त महाराष्ट्राच्या दिशेने मोहीम स्वरुपात काम करावे. मुंबईतील रस्त्यांवरील धुळीला आळा घालण्यासाठी पाण्याची फवारणी करण्याकरिता एक हजार टॅंकर्स लावावेत त्यासाठी विशेथ पथक नियुक्त करावे. एमएमआरडीइची बांधकाम स्थळे धुळमुक्त आणि स्वच्छ करावीत. अण्टी स्मॉग गन, स्प्रिंकलर्सचा वापर वाढवावा असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी महापालिका आयुक्तांना दिले आहेत.
सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणार ही अफवा – मुख्यमंत्री शिंदे
तत्पूर्वी मुंबईतील वाढत्या प्रदूषणासंदर्भात हायकोर्टाने प्रशासनाला उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते. यासंदर्भात 6 नोव्हेंबर रोजी मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली होती. मुंबईमध्ये 7 ते रात्री 10 या कालावधीनंतर फटाके फोडण्यास प्रशासनाने बंदी घालावी, असे निर्देश ही कोर्टाने यावेळी दिले होते. यासोबतच वाढते प्रदूषण रोखण्यासाठी तसेच हवेची गुणवत्ता सुधारण्याच्या उद्देशाने मुंबईतील सर्व बांधकामे बंद ठेवण्याच्या सूचना हायकोर्टाने दिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्र्यांच्या आजच्या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले आहे.
One Comment on “राज्यातील प्रदूषण नियंत्रणासाठी मुख्यमंत्र्यांच्या सूचना”