एसटीच्या नवीन बसेस घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांची मंजुरी

मुंबई, 23 नोव्हेंबरः (विश्वजीत खाटमोडे) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या संचालक मंडळाची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. त्यानूसार, राज्यातील प्रत्येक बसस्थानकावर महिला बचत गटासाठी एक स्टॉल देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. तसेच माजी सैनिकांच्या विधवा पत्नींना तसेच दिव्यांगांना बसस्थानकावर 10 टक्के स्टॉल देण्यात यावेत, असे निर्देश देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी एसटी महामंडळाला दिले आहेत.

तसेच या बैठकीत प्रवाशांना चांगल्या सुविधेसाठी महामंडळात नवीन वर्षात 3 हजार 495 एसटी बसेस सेवेत दाखल करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली आहे. बसस्थानकांच्या स्वच्छतेला प्राधान्य देतानाच त्यांचा चेहरामोहरा बदलण्याच्या सूचना देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. दरम्यान, एसटी महामंडळाला 20 नोव्हेंबर रोजी एका दिवशी 36.73 कोटी रुपये विक्रमी उत्पन्न झाले होते. त्याबद्दल मुख्यमंत्री शिंदे यांनी एसटी महामंडळाचे अभिनंदन केले आहे.

फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

राज्यातील सामान्य नागरिकांना एसटीच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण सेवा देण्यासाठी महामंडळाने प्रयत्न केले पाहिजे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी म्हटले. यासोबतच 2 हजार 200 साध्या बसेस घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली. त्यामुळे या बसेस 2024 अखेर एसटीच्या ताफ्यात दाखल होतील. याशिवाय, एसटीच्या 21 वेगवेगळ्या विभागांसाठी 1295 साध्या बसेस भाडेतत्त्वावर घेण्यासाठी देखील या बैठकीत मान्यता देण्यात आली.

तसेच या बैठकीत दिव्यांगांच्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. राज्यातील सर्व एसटी बसस्थानकांमध्ये दिव्यांगांसाठी 10 टक्के स्टॉल्स आरक्षित ठेवणे , तसेच स्वाधार योजनेच्या धर्तीवर दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी योजना तयार करावी आणि शासकीय नोकऱ्यांमध्ये खऱ्या दिव्यांगांना संधी मिळावी यासाठी दिव्यांग प्रमाणपत्र पडताळणीची प्रणाली सूरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

नरेंद्र मोदींना जीवे मरण्याची धमकी देणाऱ्याला अटक

सर्वच शासकीय विभागांनी दिव्यांगांचे विषय गांभीर्याने घेऊन त्यांच्यासाठी असलेल्या योजना, कार्यक्रम गरजूंपर्यंत पोहोचवून त्याचा त्यांना लाभ द्या, यासाठी आवश्यक तो सर्वतोपरी सहाय्य करावे, असे मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले. या बैठकीला दिव्यांग कल्याण विभागाच्या दिव्यांगांच्या दारी अभियान राज्यस्तरीय समितीचे अध्यक्ष व मुख्य मार्गदर्शक आमदार बच्चू कडू यांच्यासह विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव आणि विविध पदाधिकारी उपस्थित होते.

One Comment on “एसटीच्या नवीन बसेस घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांची मंजुरी”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *