26/11 च्या हल्ल्यातील शहिदांना मुख्यमंत्र्यांनी वाहिली आदरांजली

मुंबई, 26 नोव्हेंबरः (विश्वजीत खाटमोडे) मुंबईतील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याला आज 15 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे राज्यपाल रमेश बैस यांनी आज मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयाच्या आवारातील हुतात्मा स्मारकात शहीदांना पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील यावेळी पोलीस आयुक्त कार्यालयाच्या आवारातील हुतात्मा स्मारकात शहीदांना पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी दीपक केसरकर, मंगल प्रभात लोढा, अनेक मंत्री आणि पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, 15 वर्षांपूर्वी 26 नोव्हेंबरच्या रात्री पाकिस्तानमधील लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवाद्यांनी मुंबईमधील नागरिकांवर गोळीबार केला. 26/11 च्या हल्ल्यादरम्यान या दहशतवाद्यांनी छत्रपती शिवाजी टर्मिनस, ओबेरॉय ट्रायडेंट, ताजमहाल हॉटेल, लिओपोल्ड कॅफे, कामा हॉस्पिटल आणि नरिमन लाइट हाऊस या स्थळांना लक्ष्य केले होते. या हल्ल्यात 166 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. यामध्ये परदेशी नागरिकांचा देखील मोठ्या प्रमाणात समावेश होता. तसेच या हल्ल्यामध्ये 300 हून अधिक लोक जखमी झाले होते.

संविधानाच्या बाजूने आम्ही उभे राहणार – प्रकाश आंबेडकर

26/11 च्या हल्ल्यादरम्यान कर्तव्य बजावताना राज्य पोलीस आणि राष्ट्रीय सुरक्षा रक्षक मधील 18 जवान शहीद झाले. या हल्ल्यात दहशतवाद विरोधी पथकाचे (एटीएस) तत्कालीन प्रमुख हेमंत करकरे, एनएसजीचे मेजर संदीप उन्नीकृष्णन, मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक कामटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय साळसकर आणि सहायक उपनिरीक्षक तुकाराम ओंबळे हे शहीद झाले होते.

मरीआई देवीच्या मंदिरात चोरी

तत्पूर्वी, या हल्ल्यात दहशतवादी देखील मारले गेले. त्यावेळी अजमल अमीर कसाब या एका दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात सुरक्षा यंत्रणेला यश आले. त्यानंतर मे 2010 मध्ये कसाबला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आणि दोन वर्षांनंतर त्याला फाशी देण्यात आली. दरम्यान या भयंकर दहशतवादी हल्ल्याला अनेक वर्षे उलटून जात असताना, या हल्ल्याच्या जखमा आजही लोकांच्या स्मरणात आहेत.

One Comment on “26/11 च्या हल्ल्यातील शहिदांना मुख्यमंत्र्यांनी वाहिली आदरांजली”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *