मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसंगावधान दाखवल्यामुळे वाचले तरूणाचे प्राण!

नागपूर, 18 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसंगावधान दाखवल्यामुळे एका अपघात झालेल्या तरूणाचे प्राण वाचले आहेत. नागपुर जिल्ह्यातील कंपनीच्या दुर्घटनेची पाहणी करून येत असताना मुख्यमंत्र्यांना ट्रक आणि दुचाकी यांच्यात अपघात झाल्याचे दिसले. त्यानंतर शिंदे यांनी आपल्या गाड्यांचा ताफा थांबवून ते स्वतः घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या ताफ्यातील रुग्णवाहिका देऊन या तरूणाला स्वतः नागपुरातील सेनगुप्ता रुग्णालयात दाखल केले.

https://twitter.com/mieknathshinde/status/1736594846264263136?s=19

एकनाथ शिंदे यांनी काल रात्री नागपूर जिल्ह्यातील बाजारगाव येथील सोलर अर्नामेंट्स कंपनीत झालेल्या स्फोटाच्या घटनास्थळाला भेट देऊन परिसराची पाहणी केली. त्यानंतर ताफ्यासोबत नागपुरकडे परतत असताना मुख्यमंत्र्यांना गोंडखैरीच्या बस स्थानकाजवळ एक भीषण अपघात झाल्याचे निदर्शनास आले. या भीषण अपघातात एका ट्रक आणि दुचाकी यांच्यात धडक झाल्यामुळे दुचाकी चालक ट्रकच्या बोनेटमध्ये जाऊन अडकला होता. त्याचवेळी या ट्रकला एक कार येऊन धडकली होती. त्यामुळे या कारमधील काही जण जखमी झाले.



ही परिस्थिती पाहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचा ताफा थांबवला. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वतः घटनास्थळी जाऊन या तरूणाला ट्रकखालून काढण्याच्या सुचना दिल्या. या तरूणाचा पाय गंभीर जखमी असल्याचे कळताच मुख्यमंत्र्यांनी आपल्या ताफ्यातील रुग्णवाहिका देऊन या तरूणाला स्वतः नागपुरातील सेनगुप्ता रुग्णालयात दाखल केले. त्यासोबतच या कार अपघातातील जखमींना देखील रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले.

https://twitter.com/CMOMaharashtra/status/1736482529790820633?s=19

https://twitter.com/MahaDGIPR/status/1736451235346288726?s=19

त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी स्वतः रुग्णालयात जाऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. या तरूणाला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले असून आता त्याची सध्या प्रकृती स्थिर आहे. गिरीश केशरावजी तिडके असे या तरूणाचे नाव असून तो नागपूरच्या गोंड खैरीवाडी येथील रहिवासी आहे. त्यासोबतच वंदना राकेश मेश्राम, रंजना शिशुपाल रामटेके, शुद्धधन बाळूजी काळपांडे असे कारमधील जखमींची नावे आहेत. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *