मुंबई, 25 नोव्हेंबरः (विश्वजीत खाटमोडे) राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचा कराड दौरा अचानक रद्द केल्याची बातमी समोर आली आहे. प्रकृती अस्वस्थ्यामुळे एकनाथ शिंदे यांनी त्यांचा कराड दौरा रद्द केल्याचे म्हटले जात आहे. राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची आज पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळाचं दर्शन घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज सातारा जिल्ह्यातील कराड येथे येणार होते. मात्र, त्यांची प्रकृती सध्या ठीक नसल्यामुळे ते आज कराडमध्ये येणार नाहीत.
राजकीय डेंग्यू माझ्या स्वभावात आणि रक्तामध्ये नाही – अजित पवार
दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत ठीक नसून ते सध्या आजारी असल्याची माहिती शिवसेना नेते आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी दिली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा कराड दौरा रद्द करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान यशवंतराव चव्हाण यांची आज पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त राज्यातील अनेक नेते आज सकाळपासूनच कराडमध्ये दाखल झाल्याचे पाहायला मिळाले आहे.
डीपफेक प्रकरणांची चौकशी करण्यासाठी विशेष अधिकाऱ्याची नियुक्ती होणार
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज यशवंतराव चव्हाण यांच्या कराडमधील स्मृतिस्थळावर जाऊन त्यांना पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. यावेळी आमदार दीपक चव्हाण, माजी आमदार आनंदराव पाटील, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, पोलीस अधीक्षक समीर शेख, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी त्या काळात घेतलेले निर्णय आजही महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे अजित पवार यांनी यावेळी म्हटले आहे.
One Comment on “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजारी; कराड दौरा रद्द”