सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याला छगन भुजबळांचा विरोध

मुंबई, 7 नोव्हेंबरः (विश्वजीत खाटमोडे) राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयाला विरोध केला आहे. तसेच मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देऊ नये, असेही छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण दिले तर सध्या जे ओबीसीमध्ये आहेत त्यांचे यामध्ये नुकसान होईल, असे त्यांचे म्हणणे आहे. तर यासंदर्भात चर्चा करण्यासाठी छगन भुजबळ यांनी आज त्यांच्या शासकीय निवासस्थानी ओबीसी समाजातील नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीला ओबीसी समाजाचे अनेक नेते उपस्थित होते.

छत्तीसगडमध्ये मतदानावेळी नक्षलवाद्यांचा हल्ला

मराठा आरक्षणाला मी किंवा माझ्या पक्षाने कधीच विरोध केला नाही, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. परंतू मराठा समाजाला आरक्षण देताना इतर कुणाच्याही आरक्षणाला धक्का लागता कामा नये, अशी माझी पहिल्यापासूनची भूमिका आहे. त्यामुळे राज्य सरकारने मराठा समाजाला वेगळे आरक्षण द्यावे. मराठा आरक्षण संदर्भात न्यायालयीन प्रक्रियेत अडचणी असतील त्या दूर करून मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अशी छगन भुजबळ यांची भूमिका आहे. ओबीसीमध्ये अनेक जाती आहेत. त्यामुळे मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण दिले तर यामध्ये सगळ्यांचेच नुकसान होणार होईल, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

भारत-पाक सीमेवरील शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ नये, अशी मागणी छगन भुजबळांनी केली होती. तसेच जर मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिले तर याचा ओबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? यासंदर्भात आजच्या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीनंतर ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊ नये. त्यांनी सरकारमध्येच राहून ओबीसी समाजासाठी लढावे, असे प्रकाश शेंडगे म्हणाले. आम्ही ओबीसी आरक्षणाचे रक्षण करण्यासाठी रस्त्यावरची लढाई सुरू करणार आहोत. त्यासाठी आम्ही येत्या दिवाळीनंतर राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलने करणार आहोत. या आमच्या लढ्यात देशभरातील ओबीसी नेत्यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन प्रकाश शेंडगे यांनी केले आहे. ओबीसी आरक्षणाला कसलाही धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार, असे राज्य सरकारने स्पष्ट केले होते. मात्र आता राज्य सरकार मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देत आहे. त्यामुळे ओबीसी समाजाचे नुकसान होणार आहे. सरकारच्या या निर्णयाविरोधात आता रस्त्यावर उतरल्याशिवाय दुसरा मार्ग नाही, असे प्रकाश शेंडगे म्हणाले आहेत. तर या मुद्द्यावरून सध्या अनेक ओबीसी नेते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

One Comment on “सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याला छगन भुजबळांचा विरोध”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *