छगन भुजबळ यांची जरांगे पाटील यांच्यावर टीका

जालना, 17 नोव्हेंबरः (विश्वजीत खाटमोडे) ओबीसी समाजाच्या वतीने आज जालना जिल्ह्यातील अंबड येथे महाएल्गार सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार, राजेश राठोड, भाजप आमदार गोपीचंद पडळकर, प्रकाश शेंडगे आणि महादेव जानकर यांच्यासह अनेक प्रमुख ओबीसी नेते उपस्थित होते. या महासभेला 5 लाखांहून अधिक लोक उपस्थित होते. या सभेत छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. अचानकपणे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्राच्या नोंदी कशा मिळत आहेत, असा प्रश्न छगन भुजबळ यांनी यावेळी उपस्थित केला.

मराठा आरक्षणासाठी खंडोबा देवाला जरांगे पाटलांनी घातले साकडे

“ओबीसींना घटनात्मकदृष्ट्या आणि सर्वोच्च न्यायालयाच्या मंजुरीनंतर आरक्षण मिळाले. मनोज जरांगे म्हणतात की, आम्ही मराठा समाजाचे 70 वर्षांचे आरक्षण काढून घेतले. आम्ही जरंगेच्या कुटुंबाकडून काही हिसकावून घेत आहोत का? मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही. मात्र ओबीसी आरक्षणाला कसलाही धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे. मराठा समाजातील लोकांच्या कुणबी नोंदी अचानक कशा समोर येत आहेत?” असे छगन भुजबळ यावेळी म्हणाले.

पुढे छगन भुजबळ म्हणाले की, “राज्यातील ओबीसी आरक्षणाच्या रक्षणासाठी लढणार नाहीतर मरणार. आमच्या आरक्षण कोट्यावर परिणाम होत असेल तर तो कोणत्याही किंमतीत खपवून घेतला जाणार नाही. राज्य सरकारने ओबीसी प्रवर्गातील जातीनिहाय जनगणना करावी. असे झाल्यास दूध का दूध, पानी का पानी होईल.” राज्य सरकारने कुणबी प्रमाणपत्राचे वितरण तात्काळ थांबवावे. सरकारने मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी आरक्षणात कपात करू नये. अशी मागणी भुजबळांनी यावेळी केली.

डीपफेक संदर्भात पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली चिंता

या महाएल्गार सभेत छगन भुजबळ यांनी जरांगे पाटील यांच्यावर टीका केली. जरांगे म्हणतात की, मी दोन वर्षे झुणका भाकरी खाऊन बाहेर आलोय. हे खरे आहे, आजही मी दिवाळीला ही तेच खातो. तसेच आता मी माझ्या कष्टाची भाकर खातो. पण मी जरंगे पाटलांसारखी मी सासरची भाकरी मोडत नाही. असे छगन भुजबळ यावेळी म्हणाले. त्याचबरोबर छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे कौतुक केले आहे. शरद पवारांनी राज्यात मंडल आयोग लागू केला. मंडल आयोग तत्कालीन पंतप्रधान व्हीपी सिंह यांनी स्वीकारला. त्यामुळे आम्हाला 27 टक्के आरक्षण मिळाले. ओबीसींना आरक्षण देऊन आमचे नुकसान झाल्याचा आरोप अनेकजण करतात. पण हे योग्य नाही. असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

2 Comments on “छगन भुजबळ यांची जरांगे पाटील यांच्यावर टीका”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *