चंद्राबाबू नायडू यांनी घेतली आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाची शपथ

विजयवाडा, 12 जून: (विश्वजीत खाटमोडे) तेलुगु देसम पक्षाचे (टीडीपी) अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांनी बुधवारी आंध्र प्रदेश राज्याचे 24 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. ते चौथ्यांदा आंध्र प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री बनले आहेत. त्याचबरोबर त्यांनी आंध्र प्रदेशमध्ये सर्वाधिक वेळा मुख्यमंत्री बनण्याचा विक्रम केला आहे. सोबतच जनसेना प्रमुख आणि अभिनेते पवन कल्याण यांनी यावेळी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. हा शपथविधी सोहळा विजयवाडा येथे पार पडला. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह एनडीए आघाडीचे अनेक नेते उपस्थित होते.

https://twitter.com/ANI/status/1800771268423381405?s=19

https://twitter.com/AHindinews/status/1800774226116563363?s=19



दरम्यान, लोकसभा निवडणुकीनंतर देशात नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएचे सरकार स्थापन झाले आहे. त्यानंतर आंध्र प्रदेशात देखील आता एनडीएचे सरकार आले आहे. यावेळी आंध्र प्रदेश मध्ये चंद्राबाबू नायडू यांच्यासह नव्या एनडीए सरकारमध्ये राज्य मंत्रिमंडळातील 25 मंत्र्यांनीही शपथ घेतली. चंद्राबाबू नायडू यांच्या मंत्रिमंडळात 17 नवीन चेहऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर नायडू यांनी पंतप्रधान मोदींना व्यासपीठावर मिठी मारली. याप्रसंगी आंध्र प्रदेशचे राज्यपाल एस अब्दुल नजीर यांनी चंद्राबाबू नायडू यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

अनेक मान्यवरांची उपस्थिती

या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यासह, जे.पी. नड्डा, नितीन गडकरी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, रामदास आठवले, चिराग पासवान यांच्यासह एनडीएचे अनेक नेते आणि मान्यवर उपस्थित होते. तत्पूर्वी, त्यांच्या शपथविधी सोहळ्याच्या एक दिवस आधी एन चंद्राबाबू नायडू यांनी मंगळवारी अमरावती ही आंध्र प्रदेश राज्याची एकमेव राजधानी असेल, अशी घोषणा केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *