कोकणात आज पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज

महाराष्ट्र पावसाचा अंदाज

मुंबई, 31 मे: (विश्वजीत खाटमोडे) कोकणात आज तुरळक ठिकाणी पाऊस किंवा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. तर राज्याच्या उर्वरित भागांतील हवामान कोरडे राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. तर आजच्या दिवशी राज्यातील मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांतील तुरळक ठिकाणचे तापमान उष्ण आणि दमट राहील, असे हवामान विभागाने म्हटले आहे. तर येत्या 5 दिवसांत देशातील बिहार, झारखंड, गंगा पश्चिम बंगाल, ओडिशा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे.

https://twitter.com/InfoRaigad/status/1796386540886868296?s=19

https://twitter.com/Indiametdept/status/1796455392631009737?s=19

तापमानात घट होण्याची शक्यता

तर दुसरीकडे उत्तर-पश्चिम, मध्य आणि पूर्व भारतात असलेली उष्णतेच्या लाटेची स्थिती पुढील 2 ते 3 दिवसांत हळूहळू कमी होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. तर कालच्या तुलनेत आज वायव्य भारतातील काही भागांमध्ये उष्णतेच्या लाटेची तीव्रता किंचित कमी झाली आहे. तथापि, आज राजस्थान, हरियाणा-चंडीगड-दिल्ली, झारखंडच्या अनेक भागांमध्ये उष्णतेची तीव्र लाट आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.

https://twitter.com/airnews_mumbai/status/1796453829720039699?s=19

ईशान्य भारतात मान्सून दाखल

दरम्यान, मान्सून काल केरळमध्ये दाखल झाला आहे. त्यानंतर मान्सूनने आज संपूर्ण नागालँड, मणिपूर, मिझोराम, अरुणाचल प्रदेश आणि त्रिपुरा, मेघालय आणि आसामच्या बहुतांश भागांसह ईशान्य भारताच्या बहुतांश भागांमध्ये प्रवेश केला आहे. या पार्श्वभूमीवर ईशान्य भारतात पुढील 4 ते 5 दिवसांत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस सुरू राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. येत्या 2 ते 3 दिवसांत कर्नाटक, तमिळनाडू आणि पुडुचेरीसह दक्षिण भारताच्या उर्वरित भागात मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल परिस्थिती आहे. या काळात मान्सून पश्चिम बंगाल आणि सिक्कीमच्या डोंगराळ प्रदेशासह ईशान्य भारताच्या सर्व भागांत पोहोचेल, अशी शक्यता हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय मोहपात्रा यांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *