कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापतीची निवड बिनविरोध!

बारामती, 16 मेः बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीची निवडणूक ही एक हाती झाल्याने सभापती आणि उपसभापती पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडं लक्ष लागले होते. या संदर्भात आज, 16 मे 2023 रोजी बैठक घेत सभापती पदी सुनिल पवार आणि उपसभापती पदी निलेश लडकत यांची निवड बिनविरोध जाहीर करण्यात आली आहे.

नीरा- मोरगाव रस्ता बनला अपघात प्रवर्तन!

बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदाच्या निवडीच्या अगोदर राज्याचे विरोधी पक्षनेते तथा राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादीचे बारामती तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत सभापती पदी माळेगाव खुर्द येथील सुनिल पवार तर उपसभापती पदी शेरेवाडी- बाबूर्डी येथील निलेश लडकत यांची नावे जाहीर केली.

पालखी सोहळ्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करा- प्रांताधिकारी

याप्रसंगी तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद टंकसाळे, तालुका राष्ट्रवादीचे कार्यध्यक्ष धनवान वदक, दूध संघाचे चेअरमन संदिप जगताप, बारामती खरेदी विक्री संघाचे चेअरमन दत्तात्रय आवळे, लक्ष्मण मोरे, नारायणराव कोळेकर, तुषार कोकरे, सुनिल बनसोडे, दिलीप परकाळे, विलास कदम, संभाजी किर्वे, सूर्यकांत गादीया यासह सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.

One Comment on “कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापतीची निवड बिनविरोध!”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *