दिल्ली, 05 ऑक्टोंबर: (विश्वजीत खाटमोडे) राज्यातील अहमदनगर शहराचे आणि जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. राज्य सरकारच्या या निर्णयाला केंद्रीय गृह मंत्रालयाने मान्यता दिली आहे. याबाबतची अधिसूचना राज्य सरकारने जारी केली आहे. त्यामुळे अहमदनगर जिल्हा आता अहिल्यानगर म्हणून ओळखला जाणार आहे. अहमदनगर जिल्ह्याचे नामांतर करण्याच्या निर्णयाला केंद्र सरकारने मंजुरी दिल्यानंतर महसूलमंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नामांतराच्या या निर्णयाचे स्वागत करून आनंद व्यक्त केला. यासंदर्भात त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारचे आभार मानले आहेत.
https://x.com/InfoAhmednagar/status/1842389644786430431?t=O-CE1fWFnVXcm-Vf5JSA2Q&s=19
https://x.com/RVikhePatil/status/1842130289675444675?t=3ubdQwzvlwH6-oewmqv_Fg&s=19
विखे पाटलांनी मानले आभार!
अहमदनगर जिल्ह्याचे नामांतर अहिल्यानगर करण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजूरी दिली. आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत जिल्ह्याचे नामकरण अहिल्यानगर करण्यास मान्यता मिळाल्याने वचनपूर्ती झाल्याचा मनस्वी आनंद आहे. हा निर्णय होण्याकरीता सहकार्य करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेही मनापासून आभार! असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.
https://x.com/AjitPawarSpeaks/status/1767864014464491949?t=tnQUneqErGLJ52jk5LemDQ&s=19
राज्य सरकारने घेतला होता निर्णय
दरम्यान, अहमदनगर जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी गेल्या काही वर्षांपासून करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली 13 मे 2024 रोजी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली होती. या बैठकीत अहमदनगर शहर आणि जिल्ह्याचे नामांतर अहिल्यानगर असे करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर यासंदर्भातील प्रस्ताव मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला होता. केंद्र सरकारने आता अहमदनगर शहराचे आणि जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर करण्याच्या या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. त्यामुळे अहमदनगरचे नाव आता अहिल्यानगर झाले आहे.