सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर; 87.98 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

दिल्ली, 13 मे: (विश्वजीत खाटमोडे) केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) इयत्ता बारावीचा निकाल आज जाहीर केला आहे. यंदा देशात सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेत 87.98 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ही टक्केवारी गेल्या वर्षीच्या तुलनेत 0.65 टक्क्यांनी वाढली आहे. यावर्षीच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे. यामध्ये 91.52 टक्के टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर 85.12 टक्के मुले पास झाली आहेत. निकाल ऑनलाइन पद्धतीने जाहीर झाला असून, विद्यार्थ्यांना हा निकाल सीबीएसई बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर पाहता येईल.

https://twitter.com/ddsahyadrinews/status/1789914628681568571?s=19

त्रिवेंद्रमचा निकाल सर्वोत्कृष्ट

यंदा भारतातील बारावीच्या 16 लाख 21 हजार 224 विद्यार्थ्यांनी सीबीएसई बोर्डाची परीक्षा दिली होती. सीबीएसई बोर्डाची इयत्ता बारावीची परीक्षा 15 फेब्रुवारी 2024 ते 2 एप्रिल 2024 या कालावधीत पार पडली. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष या परीक्षेच्या निकालाकडे लागले होते. आज अखेर या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेत देशात केरळच्या त्रिवेंद्रमचा निकाल सर्वोत्कृष्ट लागला आहे. त्रिवेंद्रममध्ये तब्बल 99.91 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

पुणे विभाग देशात 9 नंबर

याशिवाय, विजयवाडा – 99.04 टक्के, चेन्नई – 98.47 टक्के, बेंगळुरू – 96.95 टक्के, पश्चिम दिल्ली – 95.64 टक्के, पूर्व दिल्ली – 94.51 टक्के, पंचकुला – 90.26 टक्के, पुणे – 89.78 टक्के, अजमेर – 89.53 टक्के, डेहराडून – 83.82 टक्के, पाटणा – 83.59 टक्के, भुवनेश्वर – 83.34 टक्के, भोपाळ – 82.46 टक्के, गुवाहाटी – 82.05 टक्के, नोएडा – 80.27 टक्के आणि प्रयागराजमध्ये 78.25 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *