अरविंद केजरीवाल यांना तीन दिवसांची सीबीआय कोठडी

दिल्ली, 26 जून: (विश्वजीत खाटमोडे) दिल्ली दारू घोटाळ्याशी संबंधित प्रकरणात राऊस एव्हेन्यू कोर्टाने दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे राष्ट्रीय अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांना तीन दिवसांच्या सीबीआय कोठडी सुनावली आहे. सीबीआयने अरविंद केजरीवाल यांना मद्य धोरण प्रकरणात आज सकाळी औपचारिकपणे अटक केली. त्यानंतर सीबीआयने त्यांना दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टासमोर हजर केले. त्यावेळी कोर्टात दारू धोरण प्रकरणी सुनावणी झाली. याप्रकरणी कोर्टाने केजरीवाल यांना 3 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे.

https://x.com/AHindinews/status/1805977541599166831?s=19

https://x.com/AHindinews/status/1805837842733535395?s=19

https://x.com/AHindinews/status/1805645694579228851?s=19

अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ

तत्पूर्वी सीबीआयने काल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची तिहार तुरूंगात जाऊन चौकशी केली. त्यावेळी त्यांनी मद्य धोरण प्रकरणाशी संबंधित केजरीवाल यांचे जबाब नोंदवले. त्यानंतर सीबीआयने अरविंद केजरीवाल यांना अटक करून आज कोर्टात हजर केले. या सुनावणीवेळी अरविंद केजरीवाल यांची अधिकृतपणे चौकशी करण्याची परवानगी सीबीआयने कोर्टाकडे मागितली. तसेच यावेळी सीबीआयने केजरीवाल यांच्या पाच दिवसांच्या कोठडीची मागणी केली. मात्र, केजरीवाल यांना कोर्टाने 3 दिवसांची कोठडी सुनावली. त्यामुळे आधीच तुरूंगात असलेल्या केजरीवाल यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. दिल्लीच्या मद्य धोरणातील कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अरविंद केजरीवाल यांची आता सीबीआय नव्याने चौकशी करणार आहे.

https://x.com/KejriwalSunita/status/1805900689757114593?s=19

सुनिता केजरीवाल यांची नाराजी

तर या प्रकरणाची पुढील सुनावणी 29 जून रोजी होणार आहे. दरम्यान, सीबीआयने अरविंद केजरीवाल यांना अटक केल्याप्रकरणी अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनिता केजरीवाल यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यासंदर्भात ट्विट केले आहे. “अरविंद केजरीवाल यांना 20 जून रोजी जामीन मिळाला. त्यांच्या जामीनाला ईडीने तात्काळ स्थगिती दिली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी सीबीआयने अरविंद केजरीवाल यांना आरोपी बनवून आज अटक केली. ती व्यक्ती तुरूंगातून बाहेर येऊ नये, यासाठी संपूर्ण यंत्रणा प्रयत्नशील आहे. हा कायदा नाही. ही हुकूमशाही आहे, ही आणीबाणी आहे,” असे सुनिता केजरीवाल यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *