बारामतीतील पोलीस हवालदारासह होमगार्डवर गुन्हा दाखल

बारामती, 24 मेः बारामती शहर पोलीस स्टेशनमधील एका हवालदार आणि होमगार्ड विरोधात लाच मागितल्या संदर्भात तक्रार दाखल करण्यात आला आहे. या तक्रारीवरून बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार अण्णासाहेब नामदेव उगले आणि होमगार्ड सनी शामराव गाढवे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात संशयित आरोपी पोलीस हवालदार अण्णासाहेब उगलेंना अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, एका वॉरंटमध्ये तक्रारदाराला अटक न करण्यासाठी 1 हजार रुपयांची लाचेची मागणी करण्यात आली. पैसांचा तगादा लावल्याने तक्रारदाराने अखेर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) संशयित आरोपींविरोधात तक्रार दाखल केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वॉरंटमध्ये अटक न करण्यासाठी तक्रारदाराला होमगार्ड सनी गाढवे याने 1 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती 800 रुपये देण्याचे ठरले होते. या प्रकाराची एसीबीने दखल घेत 5 व 6 मे रोजी पडताळणी केली होती. तपासात हवालदार अण्णासाहेब उगले याने लाचेच्या मागणीला प्रोत्साहन दिल्याचे उघड झाले. तपासानुसार संशयित आरोपी हवालदार अण्णासाहेब उगले आणि होमगार्ड सनी गाढवे या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *