पार्लरसाठी आली अन् चोरले दागिने

बारामती, 5 फेब्रुवारीः बारामती येथील मळद रोड देवळे पॅराडाईज फ्लॅट नंबर 8 या ठिकाणी तेजस्विता जरांडे या महिलेने संसाराला हातभार लावावा, म्हणून घरातच लेडीज पार्लर चालवत आहेत. त्यांच्या घरात आजूबाजूच्या महिला पार्लरसाठी येत असतात. त्यामुळे त्यांच्या घरात साहजिकच महिलांचा वावर असतो. त्यांच्या घराच्या दोन चाव्या असतात. एक चावी कायम घराच्या खुंटीवर लटकवलेली असते. एक चावी त्या स्वतःजवळ ठेवतात. त्यांची घरात ठेवलेली चावी ही एक दिवस गायब झाली. त्यानंतर दिनांक 23 जानेवारी ते 28 जानेवारी 2023 दरम्यान त्या कामानिमित्त त्यांच्या मूळ गावी गेलेल्या होत्या. घरामध्ये कुणीही नव्हते. घरातील कपाटाची चावी घरामध्येच होती. घरातील त्यांचे दागिने कपाटात होते.

दिनांक 28 जानेवारी रोजी त्या परत आल्या व त्यांनी घरात पाहिले असता त्यांच्या कपाटातील दागिने त्यांना मिळून आले नाही. मग त्यांनी दुय्यम चावी पाहिले असता तीही घरात मिळून आली नाही. मग त्यांच्या लक्षात आले की, त्यांच्या घरातील दुय्यम चावी कोणीतरी वापर करून दरवाजा उघडून घरातील कपाटाच्या चावीचा वापर करून कपाटातील 14 ग्रॅम सोन्याचे गंठण, 5.6 ग्रॅम सोन्याची चैन, 2.6 ग्रॅम वजनाचे कानातील टॉप्स, कपाटात ठेवलेले रोख 5 हजार रुपये घरातून चोरी झालेल्या आहेत.

बारामतीत वृक्षतोडीचा काळाबाजार?

त्यानंतर त्यांनी बारामती शहर पोलीस ठाण्यास तक्रार दिली. पोलिसांनी तात्काळ घरफोडीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. त्यांच्या घरात अनेक महिला येत असल्याने महिलांकडे कौशल्यपूर्ण तपास करणे, तशी अवघड गोष्ट होती. अनेक महिलांना चौकशीसाठी बोलावे लागले. महिलांकडे चौकशी म्हटल्यानंतर जास्त पोलिसी खाक्या व भाषा वापरता येत नाही. परंतु पोलिसांनी कसोटीने चौकशी केली असता शेजारील परिसरात राहणाऱ्या महिलेनेच पार्लरमध्ये आले असताना फिर्यादीचे लक्ष नसताना घरातील चावी घेऊन गेल्या. तसेच त्यांच्या अनुपस्थितीत घर उघडून वरील वर्णनाचे 82 हजार रुपयांचे दागिने व पैसे घेऊन गेल्या, असे निष्पन्न झाले.

सदर महिलेस पोलिसांनी अटक केली. प्रथम वर्ग न्यायाधीश पाटील मॅडम यांच्याकडून सरकारी वकील राहुल सोनवणे यांनी व्यक्तिवाद केला. सदर महिलेची पोलिस कस्टडी घेऊन पोलीस कस्टडीमध्ये तिच्याकडे चौकशी करून वरील प्रमाणे चोरीस गेलेला सर्व 82 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. सदरचा सोन्याचे दागिने संशयित आरोपी महिलेने पुण्यामध्ये एका घाणवट ठेवण्यासाठी दिले होते. त्याच्याकडून ती पैसे घेऊन आलेली होती.

टकारी समाज हा पारधी जातीची पोट जात?

सदरचा तपास पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी सुनील महाडिक, सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वाघमारे, पोलीस हवालदार कल्याण खांडेकर, पोलीस नाईक दशरथ कोळेकर, पोलीस हवालदार शिंदे, पोलीस शिपाई तुषार चव्हाण, दशरथ इंगवले, अक्षय शिताप जामदार, शाहू राणे व लोकरे मॅडम यांनी केला आहे.

One Comment on “पार्लरसाठी आली अन् चोरले दागिने”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *